Homeटॉप स्टोरीमुंबईत कोविड रुग्णांना...

मुंबईत कोविड रुग्णांना घरच्या घरीच थोपवणार?

मुंबईतल्या कोविड रूग्णांची वाढती संख्या आणि रूग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या खाटांचा विचार करत मुंबई महापालिकेने कमी आणि मध्यम स्वरूपाचा त्रास होत असलेल्या रूग्णांना घरच्या घरीच थोपविण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. येत्या रविवारपासून या मोहिमेची अंमलबजावणी होणार आहे.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील लक्षणे असणाऱ्या कोविडबाधित रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या रुग्णशय्यांचे वाटप वैद्यकीय तपासणीनंतरच करण्याचे निर्देश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. ही वैद्यकीय तपासणी रुग्णाच्या घरी भेट देऊन अर्थात गृहभेटीद्वारे केली जाणार आहे. गृहभेटीद्वारे करण्यात येणाऱ्या या वैद्यकीय तपासण्यांचे समन्वयन विभागस्तरीय ‘वॉर्ड वॉर रुम’द्वारे करण्यात येणार आहे.

गृहभेटींद्वारे करण्यात येणाऱ्या वैद्यकीय तपासणींसाठी प्रत्येक विभागाच्या स्तरावर प्रत्येकी किमान १० तपासणी चमू व या प्रत्येक चमुसाठी स्वतंत्र रुग्णवाहिकेची व्यवस्था तत्काळ करवून घेण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्तांनी दिले असून ही व्यवस्था येत्या रविवारपासून अंमलात येणार आहे. यानुसार वैद्यकीय तपासणीनंतर रुग्णाची गरज लक्षात घेऊन त्याच्या गरजेनुरुप रुग्णशय्येचे (रूग्णालयांतील बेड) वितरण केला जाणार आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रात कोविडबाधित रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या रुग्णशय्यांच्या वाटपाचे समन्वयन २४ विभागांमध्ये कार्यरत असणाऱ्या ‘वॉर्ड वॉर रुम’द्वारे करण्यात येत आहे. यामध्ये सामान्य रुग्णशय्या, प्राणवायू पुरवठा सुविधा असणारी रुग्णशय्या (ऑक्सिजन बेड) आणि अतिदक्षता कक्षातील रुग्णशय्या अशा ३ प्रकारच्या रुग्णशय्यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

कोविड

गेल्या काही दिवसात कोविडबाधित रुग्णांची संख्या वाढल्यामुळे रुग्णांना रुग्णशय्या मिळण्यात अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर रुग्णशय्या वितरणाच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्यात येत आहे. यानुसार लक्षणे वा तीव्र लक्षणे असणाऱ्या कोविडबाधित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता असल्याची मागणी ‘वॉर्ड वॉर रुम’कडे करण्यात आल्यानंतर अशा रुग्णांची महापालिकेच्या वैद्यकीय चमुद्वारे तपासणी केली जाणार आहे. या वैद्यकीय तपासणीनंतर सदर रुग्णास रूग्णालयात दाखल करण्याची गरज हे का, असल्यास ज्या प्रकारच्या रुग्णशय्येची गरज असेल, त्या प्रकारच्या रुग्णशय्येचे वितरण ‘वॉर्ड वॉर रुम’द्वारे करण्यात येईल. शक्यतो जास्तीतजास्त रूग्णांना घरच्या घरीच उपचार करून घेण्याचा या पथकांचा प्रयत्न राहील, जेणेकरून रूग्णालयांवरील ताण कमी होईल, असा प्रयत्न या पथकाचा राहील, असे सूत्रांनी सांगितले.

गृहभेटींद्वारे करण्यात येणारी रुग्णांची वैद्यकीय तपासणीची कार्यवाही सकाळी ७.०० ते रात्री ११.०० या कालावधीदरम्यान करण्यात येईल. रात्री ११.०० ते सकाळी ७.०० या कालावधीमध्ये एखाद्या रुग्णाची वैद्यकीय तपासणी तातडीने करणे गरजेचे असल्यास अशी तपासणी महापालिकेच्या जम्बो कोविड उपचार केंद्रांमध्ये केली जाईल. तथापि, याबाबतदेखील आवश्यक ते सर्व समन्वयन हे ‘वॉर्ड वॉर रुम’द्वारेच केले जाणार आहे.

अपवादात्मक संभाव्य परिस्थितीत एखाद्या रुग्णास वैद्यकीय चमुने ज्या प्रकारच्या रुग्णशय्येचे वितरण करण्याचे सुचविले आहे, त्या प्रकारची रुग्णशय्या उपलब्ध नसल्यास अशा रुग्णाला प्रतिक्षा सूचीवर ठेवण्यात येईल व काही तासांनी रुग्णशय्या उपलब्ध झाल्यानंतर रुग्णशय्येचे वितरण करण्यात येईल.

विभागस्तरीय ‘वॉर्ड वॉर रुम’कडे येणाऱ्या दूरध्वनींची संख्या गेल्या काही दिवसात वाढली आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येक विभागस्तरीय ‘वॉर्ड वॉर रुम’मधील दूरध्वनी क्रमांकाला ३० हंटींग लाईनची सुविधा एम.टी.एन.एल.कडून उपलब्ध करुन घेण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content