Homeकल्चर +उद्या बघा सिद्धार्थ...

उद्या बघा सिद्धार्थ जाधवचा ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’!

उद्या रसिकांना सहकुटूंब, सहपरिवार भरभरून मनोरंजनाचा अनुभव घेता येणार आहे. कारण आहे ‘अल्ट्रा झकास’, या मराठी ओटीटीवर ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या सुपरहिट चित्रपटाचा उद्या, २३ ऑक्टोबर २०२३ रोजी वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘प्रदीप मेस्त्री’ यांनी केले असून सिद्धार्थ जाधव, महेश मांजरेकर, कमलाकर सातपुते, गौरव मोरे, हेमांगी कवी, संस्कृती बालगुडे, सौरभ गोखले, स्मिता शेवाळे आणि निथा शेट्टी यांच्या अभिनयाने हा  चित्रपट उजळून आला आहे. पंकज पडघम आणि उद्भव ओझा यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरांनी चित्रपटातील गाणी गाजणार आहेत.

बाब्याच्या (सिद्धार्थ जाधव) लग्नात त्याची एक्स गर्लफ्रेंड प्रियंका (हेमांगी कवी) गोंधळ घालण्यासाठी येते. परंतु गडबडे बाबाच्या (महेश मांजरेकर) आशीर्वादाने समीर (सौरभ गोखले) बाब्याच्या मदतीला येऊन तिला अडवतो. परंतु त्याच वेळी प्रियंकाचा भाऊही (कमलाकर सातपुते) येतो आणि तिथे एक नवा तूफान विनोदी गोंधळ सुरू होतो. या गोंधळात बाब्याचं लग्न होतं की नाही? या कोड्याचं उत्तर या चित्रपटात मिळणार आहे.

दर आठवड्यात एक नवा चित्रपट आम्ही आणत असतो. ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ हा चित्रपटही प्रेक्षकांचं मन अगदी बहरून टाकेल यात काही शंका नाही, असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लि.चे सी.ई.ओ. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

सर्व लाईन व्यस्त आहेत’ या चित्रपटाचे प्रोमो पाहण्यासाठी लिंकः

https://www.facebook.com/UltraJhakaas

https://www.instagram.com/ultrajhakaas

https://www.youtube.com/@ultrajhakaas

Continue reading

‘जीव’ आणि ‘एप्रिल मे ९९’ कान्स महोत्सवात!

फ्रान्समध्ये आयोजित होणाऱ्या प्रतिष्ठित कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील 'फिल्म मार्केट' विभागासाठी 'जीव - द क्रिएचर' आणि 'एप्रिल मे ९९' या दोन मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. जागतिक चित्रपटसृष्टीचे लक्ष वेधून घेणाऱ्या या व्यासपीठावर मराठी चित्रपटांची झालेली ही निवड...

भारत-ऑस्ट्रेलियात व्यापारवृद्धीसाठी झाली बैठक

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सेंद्रिय उत्पादनांवरील एमआरए, भेंडी, डाळिंब, द्राक्षे, कॉटेज चीज, मॅकॅडॅमिया नट्स, मसूर आणि एवोकॅडो यासारख्या उत्पादनांशी संबंधित बाजारपेठ प्रवेशसमस्या, प्रशुल्क दर कोटाव्यवस्था, ऑस्ट्रेलियातील औषधविषयक विशेषतः जेनेरिक औषधांचे किंमत नियंत्रण, व्हिस्की आणि वाईनच्या व्यापाराला चालना देण्याकरीता दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये नुकतीच बैठक झाली. वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांच्या...

सलमान शूटआऊट प्रकरणात छोटा शकीलचे पंटर्स?

सुमारे 15 दिवसांपूर्वी सलमान खान शूटआऊटप्रकरणी व्यक्त केलेली भीती आता हळूहळू खरी ठरत असल्याचे दिसत आहे. लॉरेन्स बिष्णोई याच्या पंटर्सनी हल्ला केल्याची जबाबदारी घेतली असल्याचे जाहीर झाले असले तरी लॉरेन्सचा मुंबईत बेस नाही. मुंबईत बेस नसल्याने तो अन्य टोळ्यांचे...
Skip to content