Homeन्यूज ॲट अ ग्लांसकेंद्रीय मंत्री जे....

केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा रुग्णालयात दाखल

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल, १३ ऑगस्टच्या सायंकाळी जे. पी. नड्डा यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना तातडीने नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (AIIMS) उपचारासाठी नेण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांच्या पथकाने त्यांची वैद्यकीय तपासणी केली. यादरम्यान त्यांची कोरोनरी अँजिओग्राफी आणि इतर आवश्यक वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते. सध्या त्यांना एम्सच्या हृदयरोग विभागात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली निरीक्षणासाठी ठेवण्यात आले आहे.

एम्स रुग्णालयाकडून हेल्थ अपडेट: एम्स प्रशासनाने अधिकृत पत्रक जारी करून जे. पी. नड्डा यांची प्रकृती आता स्थिर आहे असे स्पष्ट केले आहे. त्यांच्या तब्येतीबाबत चिंतेचे कोणतेही कारण नसून, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असल्याचेही सांगण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची तब्येत बिघडल्याची बातमी समोर आल्यानंतर भाजप समर्थक, पक्षाचे नेते आणि राजकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे एम्सच्या डॉक्टरांनी सांगताच सर्वांना किंचितसा दिलासा मिळाला आहे.  

Continue reading

राष्ट्रीय स्लिंगशॉट स्पर्धेत गौरव मोकाशींना सुवर्णपदक

१४वी राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिप-२०२६ स्पर्धा छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ४० ते ४५ वर्षे वयाच्या गटात दहिसर, मुंबईचे गौरव मोकाशी यांनी सुवर्णपदक पटकावले. या आधीच्या राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिपमध्ये त्यांना रौप्यपदक मिळाले होते....

येत्या रविवारी आस्वाद घ्या ‘त्रिधा’चा

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने आंतरराष्ट्रीय संगीत दिनाच्या निमित्ताने एक विशेष संगीत कार्यक्रम ‘त्रिधा’ सादर होणार आहे. येत्या रविवारी, १८ ऑक्टोबरला सायंकाळी साडेपाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाची संकल्पना प्रसिद्ध तबलावादक पं. विजय घाटे यांची...

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...
Skip to content