Wednesday, October 16, 2024
Homeडेली पल्सश्री गणेशमूर्तीचे विसर्जन...

श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याची पारंपरिक पद्धत

श्री गणेशमूर्तीचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे. विसर्जनाला जाताना श्री गणेशमूर्तीबरोबर दही, पोहे, नारळ, मोदक वगैरे शिदोरी द्यावी. जलाशयाजवळ पुन्हा आरती करावी व मूर्ती शिदोरीसह पाण्यात सोडून द्यावी. उपासनाविधींमुळे गणपतीच्या पवित्रकांनी समृद्ध झालेल्या मूर्तीचे विसर्जन केल्यामुळे जलस्रोत पवित्र बनतो. तसेच वाहत्या पाण्याबरोबर ही पवित्रके सर्वदूर पोहोचतात व अनेकांना त्यांचा लाभ मिळतो. या पाण्याचे बाष्पीभवनही होत असल्याच्या कारणाने एकंदर वातावरण सात्त्विक होण्यास मदत होते. विसर्जनाच्या वेळी जेथे विसर्जन केले, तेथील माती घरी आणून ती सर्वत्र शिंपडण्याची प्रथा आहे.

श्री गणेशमूती विसर्जनाबाबत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मृत्तिकेच्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करून आणलेले देवत्व एक दिवसापेक्षा जास्त दिवस राहूच शकत नाही. याचाच अर्थ गणेशविसर्जन केव्हाही केले तरी श्री गणेशमूर्तीतील देवत्व दुसऱ्या दिवशी नष्ट झालेले असते; म्हणून कोणत्याही देवाची उत्तरपूजा केल्यावर त्याचदिवशी किंवा दुसर्‍या दिवशी त्या मूर्तीचे विसर्जन होणे, हे सर्वथैव इष्ट आहे. सोयर वा सूतक असले तरी पुरोहिताकडून गणेशव्रत आचरले जाणे इष्ट आहे. त्याचप्रमाणे घरातील प्रसूतीची वगैरे वाट न पाहता ठरल्याप्रमाणे विसर्जन करणे हे शास्त्राला धरून आहे.

मूर्तीचे विसर्जन वाहत्या पाण्यात करण्याचे महत्त्व: उत्तरपूजेनंतर मूर्तीचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे. उपासनाविधींमुळे गणपतीच्या तत्त्वाने समृद्ध झालेल्या मूर्तीचे विसर्जन जलात केल्यामुळे जलस्रोत पवित्र बनतो. तसेच वाहत्या पाण्याबरोबर ही पवित्रके सर्वदूर पोहोचतात व अनेकांना त्यांचा लाभ मिळतो. या पाण्याचे बाष्पीभवनही होत असल्याने एकंदर वातावरण सात्त्विक होण्यास मदत होते. एखाद्या ठिकाणी वाहते पाणी उपलब्ध नसल्यास मूर्तीचे विसर्जन विहिरीत करावे.

गणेश

मूर्तीविसर्जन ही समस्या नाही: हल्लीच्या काळी अपुरे जलस्रोत, दूषित जल, दुष्काळ इत्यादींमुळे मूर्तीविसर्जन ही समस्या वाटते. पण लक्षात घ्या, मूर्तीविसर्जन ही समस्या असली, तरी ती पुढीलप्रमाणे सोडवता येते.

१. सार्वजनिक गणेशोत्सवांची संख्या हल्ली खूप वाढली आहे. त्यावर उपाय  म्हणून ‘एक गाव – एक गणपति’ व शहरात ‘एक विभाग – एक गणपति’ हे सूत्र पाळून आपण गणेशोत्सव साजरा करू शकतो.

२. प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती न वापरता मूर्ती शाडूमातीची व नैसर्गिक रंगांनी रंगवलेलीच वापरू शकतो. प्लास्टर ऑफ पॅरिस पाण्यात सहजरीत्या विरघळत नसल्याने मूर्तीचे नीट विसर्जन होत नाही.

मूर्तीदान करू नका; मूर्तीविसर्जन करा: जलप्रदूषणाचे कारण पुढे करून काही संघटना मूर्तीविसर्जनाच्याऐवजी मूर्तीदान करण्याचे आवाहन करतात. परंतु मूर्तीदान करणे, हे अशास्त्रीय तसेच धर्मद्रोही कृत्य आहे; कारण गणेश चतुर्थीस प्राणप्रतिष्ठापना केलेल्या मूर्तीचे विसर्जन करावे, असा शास्त्रोक्त विधी आहे. देवतांचे दान घेणे किंवा देणे हा देवतांचा अपमान आहे; कारण देवतांचे दान घेण्याचे किंवा देण्याचे सामर्थ्य मनुष्यात नाही. गणेशाची मूर्ती म्हणजे एखादे खेळणे किंवा शोभिवंत वस्तू नव्हे की, जिचा उपयोग संपला म्हणून ती दुसर्‍याला दान म्हणून दिली.

संदर्भ: सनातन संस्थेचा ग्रंथ ‘गणपति’

संपर्क क्र.: 9920015949

Continue reading

प्रेम, नुकसान आणि उपचार म्हणजेच जिंदगीनामा!

जिंदगीनामा, सोनी लिव्हवरील सहा भागांचा काव्यसंग्रह, शक्तिशाली कथनातून मानसिक आरोग्याच्या गुंतागुंतीचा शोध घेतो, ज्यातील प्रत्येक अद्वितीय आव्हाने हाताळते. मालिका सहानुभूती वाढवण्याचा आणि अनेकदा न बोललेल्या विषयांबद्दल संभाषण वाढवण्याचा प्रयत्न करते. प्रिया बापटसाठी, हा प्रकल्प फक्त दुसऱ्या भूमिकेपेक्षा अधिक होता–...

20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात मतदान! 23ला निकाल!!

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका एकाच टप्प्यात होणार असून त्याचकरीता येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होईल. मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार असून त्याचदिवशी निकाल जाहीर केले जातील. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. या...

जीवनाचे सार सांगणारा कोकणी चित्रपट ‘अंत्यारंभ’ नोव्हेंबरमध्ये!

किरणमयी आर कामथ निर्मित 'अंत्यारंभ', हा नवीन कोकणी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार अहे. या चित्रपटाची निर्मिती आदित्य क्रिएशन्स बॅनरच्या अंतर्गत करण्यात आली असून ह्याचे लेखन, दिग्दर्शन, गीतलेखन प्रसिद्ध कर्नाटक कोकणी साहित्य अकादमी आणि अनेक पुरस्कारप्राप्त डॉ. रमेश कामथ यांनीच केले आहे. एफटीआय, पुणे...
Skip to content