Homeन्यूज अँड व्ह्यूजतस्करी पीडितांसाठी सीमावर्ती...

तस्करी पीडितांसाठी सीमावर्ती राज्यांत उभारणार केअर होम्स

सीमावर्ती भागातील राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना मानवी तस्करी पीडितांसाठी विशेषतः अल्पवयीन मुली आणि तरुण महिलांसाठी संरक्षक आणि पुनर्वसन गृह उभारणीसाठी आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या घरांमध्ये निवारा, अन्न, वस्त्र, समुपदेशन, प्राथमिक आरोग्य सुविधा आणि इतर दैनंदिन गरजा यांसारख्या सुविधा पुरवल्या जातील. 

पीडित मुलींना मिशन वात्सल्य योजनेतील मार्गदर्शक तत्वांनुसार प्रायोजकत्व उपलब्ध करून देण्यासाठी तंदुरुस्त असल्याचे जाहीर करण्यासाठी सीडब्लूसी समोर साद करण्यात येईल आणि त्यानुसार राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती करण्यात येईल.

देशातील प्रत्येक जिल्ह्यात मानवी तस्करी प्रतिबंधक केंद्रे (AHTUs)  उभारण्यासाठी/ बळकट करण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना निर्भया निधी अंतर्गत निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याशिवाय सीमेवर पहारा देत असलेली बीएसएफ आणि एसएसबी यांसारख्या दलांना देखील मानवी तस्करी प्रतिबंधक केंद्रांसाठी निधी पुरवण्यात आला आहे. आजच्या तारखेपर्यंत सीमावर्ती भागातील 30 केंद्रांसह 788 केंद्रे कार्यरत आहेत.

मानवी तस्करीसाठी भारत हा मूळ स्थान त्याबरोबरच गंतव्य स्थान देखील आहे. नेपाळ, बांगलादेश आणि म्यानमार हे मानवी तस्करीचे स्रोत असलेले देश असून महिला आणि मुली यांना चांगले आयुष्य, रोजगार आणि भारतातील चांगल्या राहणीमानाचे आमिष दाखवून त्यांची तस्करी केली जात आहे. यापैकी बहुतेक अल्पवयीन मुली/ तरुण महिला असतात ज्यांची भारतात दाखल झाल्यानंतर विक्री केली जाते आणि त्यांना वेश्याव्यवसायात ढकलले जाते.   

या मुली/ महिला बहुतेक वेळा मुंबई, दिल्ली, हैदराबाद इ. प्रमुख शहरांमध्ये पोहोचतात जिथून त्यांना देशाबाहेर मुख्यत्वे मध्यपूर्व किंवा आग्नेय आशियायी देशांमध्ये नेले जाते. त्यामुळेच या देशांच्या शेजारी असलेल्या देशांनी अधिक दक्ष राहण्याची गरज आहे आणि या तस्करीला बळी पडलेल्या पीडितांना मदत करण्यासाठी आणि त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी या देशांमध्ये पुरेशा सोयीसुविधा असण्याची गरज आहे.

तसेच बाल न्याय कायदा, 2015 (2021 मधील सुधारणेनुसार) च्या कलम 51 नुसार मंडळ किंवा समिती सरकारी संस्था किंवा कोणत्याही कायद्या अंतर्गत नोंदणीकृत बिगर सरकारी संस्था यांची विशिष्ट कारणासाठी तात्पुरत्या स्वरुपात बालकाची जबाबदारी घेण्यासाठी त्या सक्षम आहेत का याची आवश्यक ती चौकशी करून त्यांची विहित निकषांनुसार निवड करतात आणि (2) मंडळ किंवा समिती उप-कलमांतर्गत त्यांची मान्यता लेखी नोंद केलेल्या कारणान्वये रद्द करू शकतात.

Continue reading

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...
Skip to content