Homeडेली पल्सकृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा


चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

चित्रपट निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर एआयचा प्रभावी वापर कसा करता येईल, याचे व्यावहारिक मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात येणार आहे. निर्मितीपूर्व प्रक्रिया, निर्मिती प्रक्रिया, निर्मितीपश्चात प्रक्रिया तसेच वितरण आणि विपणन, या विविध टप्प्यांमध्ये एआयच्या माध्यमातून काम अधिक परिणामकारक आणि सुलभ करण्याच्या पद्धती सहभागींसमोर मांडल्या जाणार आहेत. तेजस प्रभा विजय देऊस्कर, जगजीत सिंग आणि प्रशांत ठाकूर हे उपस्थितांना या कार्यशाळेत मार्गदर्शन करतील. एआय आधारित चित्रनिर्मिती, पटकथालेखन, दिग्दर्शन, छायांकन, दृश्य परिणाम, पोस्ट-प्रॉडक्शन आणि डिजिटल कंटेंट निर्मिती या क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभवावर आधारित मार्गदर्शन, प्रात्यक्षिके, केस स्टडी आणि संवादात्मक सत्रे या कार्यशाळेत आयोजित करण्यात आली आहेत.

दिग्दर्शक, सहाय्यक दिग्दर्शक, छायाचित्रकार व कॅमेरा सहाय्यक, संकलक, पोस्ट-प्रॉडक्शन तज्ज्ञ, व्हीएफएक्स कलाकार, मोशन डिझायनर, प्रॉडक्शन डिझायनर, लेखक, पटकथाकार, स्वतंत्र चित्रपट निर्माते तसेच चित्रपट शिक्षण घेणारे विद्यार्थी यांना या कार्यशाळेत सहभागी होता येणार आहे. कार्यशाळेसाठी नावनोंदणी आवश्यक असून प्रशिक्षणार्थी शुल्क १,०००/- रुपये आकारण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क: सगुण सावंत (9323043520).

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content