Homeचिट चॅटसिबिईयु शालेय कॅरम...

सिबिईयु शालेय कॅरम स्पर्धेत तनया दळवी अजिंक्य

मुंबईतल्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे सिबिईयु व न्यू इंडिया अॅशुरन्स कंपनी लिमिटेडच्या सहकार्याने आयोजित राज्यस्तरीय शालेय मुलामुलींच्या विनाशुल्क कॅरम स्पर्धेचे अजिंक्यपद राष्ट्रीय ख्यातीची सबज्युनियर कॅरमपटू तनया दळवीने पटकाविले. महात्मा गांधी विद्यालयाच्या तनया दळवीने संपूर्ण डावात अचूक खेळासह राणीवर कब्जा राखत पोद्दार अकॅडमी-मालाडचा उदयोन्मुख कॅरमपटू प्रसन्न गोळेचा  निसटता पराभव केला.

प्रारंभी आघाडी घेऊनही प्रसन्न गोळेला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. को-ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे खजिनदार प्रमोद पार्टे, कॅरमप्रेमी अविनाश नलावडे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत १६ विजेत्या-उपविजेत्यांना स्ट्रायकरसह पुरस्काराने गौरविण्यात आले. को-ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियन-सिबिईयु संस्थेच्या ६५व्या वर्धापनदिनानिमित्तचा हा मोफत क्रीडा उपक्रम युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ, कार्याध्यक्ष सुनील साळवी, सरचिटणीस नरेंद्र सावंत आदी पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीमध्ये तनया दळवीने शारदाश्रम विद्यामंदिरच्या सोहम जाधवला तर प्रसन्न गोळेने पाटकर विद्यालय-डोंबिवलीच्या प्रसाद मानेला पराभूत केले. ध्रुव शाह, आर्यन राऊत, नील म्हात्रे, संचिता मोहिते यांनी उपांत्यपूर्व तर श्रीशान पालवणकर, वेदांत राणे, ध्रुव भालेराव, केवल कुलकर्णी, ग्रीष्मा धामणकर, वेदांत लोखंडे, प्रेक्षा जैन, अद्वैत पालांडे यांनी उपउपांत्यपूर्व उपविजेतेपदाचा पुरस्कार मिळविला. कॅरमपटू चंद्रकांत करंगुटकर व ओमकार चव्हाण यांनी प्रमुख पंचाचे कामकाज केले. मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, जैतापूर आदी जिल्ह्यातील शालेय सबज्युनियर ४४ कॅरमपटूंनी स्पर्धेत भाग घेतला होता. कामगार दिनी होणाऱ्या मोफत शालेय सुपर लीग कॅरम स्पर्धेमध्ये पहिल्या ४ विजेत्यांना थेट प्रवेश दिला जाणार आहे. तसेच को-ऑप. बँक एम्प्लॉईज युनियन सभासदांच्या १६ वर्षांखालील पाल्यांसाठी विनाशुल्क सुपर लीग कॅरम पात्रता फेरी २० एप्रिलला दादर येथे होणार आहे.

Continue reading

इराकमधून अमेरिकेची संपूर्ण सैन्यवापसी!

अमेरिकेने इराकमधून आपले सर्व सैन्य माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला असून, ३० सप्टेंबर २०२६पर्यंत सर्व अमेरिकन सैनिक मायदेशी परततील. इराकचे पंतप्रधान मोहम्मद शिया अल-सुदानी आणि अमेरिकन सेंट्रल कमांड यांच्यात झालेल्या चर्चेनंतर या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या माघारीमुळे २००३मध्ये...

केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा रुग्णालयात दाखल

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल, १३ ऑगस्टच्या सायंकाळी जे. पी. नड्डा यांना अचानक...

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...
Skip to content