Homeचिट चॅटबोरीवलीत रंगणार राज्यस्तरीय...

बोरीवलीत रंगणार राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा

क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर त्याचबरोबर मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटना आणि बिमानगर एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा येत्या २८, २९ नोव्हेंबर २०२४ रोजी बिमानगर एज्युकेशन सोसायटी शाळा, एलआयसी कॉलनी, शांती आश्रम बस डेपोसमोर, बोरीवली (पश्चिम), मुंबई- ४००१०३ येथे आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेत मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, कोल्हापूर, लातूर, अमरावती, नागपूर या ८ विभागातील १९२ खेळाडू, १६ मार्गदर्शक, व्यवस्थापक, ३० पंच व अधिकारी, २५ स्वयंसेवक असा एकूण २६३ जणांचा सहभाग असणार आहे. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी स्पर्धेची पूर्वतयारी जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर आणि मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटना यांच्यामार्फत जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर आणि उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, मुंबई विभाग, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेचे आयोजन प्रथमच मुंबई उपनगर जिल्ह्यात करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील विविध भागातून या स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडूंचे कौशल्य, कसब पाहण्याची संधी मुंबईतील क्रीडाप्रेमींना मिळणार आहे. या स्पर्धेतील खेळाडूंचा खेळ बघण्यासाठी मोठ्या संख्येने खेळाडू, पालक, प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा क्रीडाधिकारी आणि मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटना यांनी केले आहे.

Continue reading

रजेवर भिमनवार; एमपीएससीच्या हंगामी अध्यक्षपदी वाघोले स्वार!

राज्याच्या विधि न्याय विभाग आणि संसदीय कार्य विभागाचे निवृत्त सचिव सतीश वाघोले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) हंगामी (प्रभारी) अध्यक्षपदी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी नियुक्ती केली आहे. एम.पी.एस.सी.च्या प्रश्नपत्रिका फुटत असल्याच्या प्रकरणावरून एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्यासाठी...

राष्ट्रीय स्लिंगशॉट स्पर्धेत गौरव मोकाशींना सुवर्णपदक

१४वी राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिप-२०२६ स्पर्धा छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ४० ते ४५ वर्षे वयाच्या गटात दहिसर, मुंबईचे गौरव मोकाशी यांनी सुवर्णपदक पटकावले. या आधीच्या राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिपमध्ये त्यांना रौप्यपदक मिळाले होते....

येत्या रविवारी आस्वाद घ्या ‘त्रिधा’चा

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने आंतरराष्ट्रीय संगीत दिनाच्या निमित्ताने एक विशेष संगीत कार्यक्रम ‘त्रिधा’ सादर होणार आहे. येत्या रविवारी, १८ ऑक्टोबरला सायंकाळी साडेपाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाची संकल्पना प्रसिद्ध तबलावादक पं. विजय घाटे यांची...
Skip to content