Homeचिट चॅटउद्या रंगणार‌ श्रीकांत...

उद्या रंगणार‌ श्रीकांत चषक कॅरम स्पर्धा

श्रीकांत चषक आंतर शालेय-कॉलेज कॅरम स्पर्धा जिंकण्यासाठी ज्युनियर ४८ कॅरमपटूमध्ये उद्या, १४ सप्टेंबर रोजी मुंबईत कांदिवली-पूर्व येथे चुरस होणार आहे. श्रीकांत स्पोर्ट्स क्लब-कांदिवली व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित १८ वर्षांखालील विनाशुल्क कॅरम स्पर्धेतील विजेत्या-उपविजेत्यांना एकूण ८ आकर्षक चषक व स्ट्रायकर पुरस्कार दिले जाणार आहेत.

श्रीकांत स्पोर्ट्स क्लबने गणेशोत्सव साजरा करताना यंदा प्रथमच ५ जिल्ह्यांच्या आंतर शालेय-कॉलेज कॅरम स्पर्धेचा मोफत उपक्रम साकारला आहे. विवा कॉलेज-विरारचे भव्या सोळंकी व जोनाथन बोनाल, आयएनजी इंग्लिश हायस्कूल-वसईचा श्रीशान पालवणकर, पार्ले टिळक विद्यालयाचा सार्थक केरकर, युनिव्हर्सल हायस्कूल-दहिसरचा वेदांत राणे, डॉ. आंबेडकर स्कूल-वरळीचा समीर खान, रुईया कॉलेजचा कौस्तुभ जागुष्टे, पाटकर विद्यालय-डोंबिवलीचे वेदांत पाटणकर व गौरांग मांजरेकर, साठे कॉलेजचा तृशांत कांबळी, वरळी सी फेस हायस्कूलचा रेहान शेख, अकबर पिरभॉय कॉलेजचे झहीर शेख व अवैस खान आदी ज्युनियर कॅरमपटू विजेतेपदाच्या दावेदारीसाठी सर्वोत्कृष्ट खेळ करण्याची शक्यता आहे.

आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष लीलाधर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकांत स्पोर्ट्स क्लबचे पदाधिकारी प्रणव निकुंब, प्रकाश चेल्लारी, सिद्धेश पवार, स्वप्निल पाटील, मिलिंद गावकर आदी मंडळी कॅरम स्पर्धा दर्जेदार होण्यासाठी विशेष कार्यरत आहेत. पंचाचे कामकाज नामवंत पंच प्रणेश पवार व चंद्रकांत करंगुटकर पाहणार आहेत. 

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content