Homeन्यूज ॲट अ ग्लांसबंगालमध्ये सुवेंदू अधिकारींचा...

बंगालमध्ये सुवेंदू अधिकारींचा पीए गोळीबारात ठार! कारचालकही जखमी!!

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे पानीपत झाल्यानंतर उफाळलेल्या हिंसाचारात बुधवारी रात्री उशिरा ममता बॅनर्जी यांना भवानीपूर मतदारसंघात पराभूत करणारे भारतीय जनता पार्टीचे नेते व मुख्यमंत्रीपदाचे दावेदार सुवेंदू अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक (पीए) चंद्रनाथ रथ यांच्यावर गोळीबार झाला. त्यात ते ठार झाले. त्यांच्या वाहनाचे चालक यात गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातल्या मध्यमग्राम परिसरात ही घटना घडली. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हा गोळीबार झाला. अधिकारी यांच्या कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर एका बिर्याणीच्या दुकानासमोर ते थांबले असताना त्यांच्या मागावर असलेल्या दोन हल्लेखोरांनी गाडीच्या आत त्यांच्या दिशेने अत्यंत जवळून एकामागोमाग तीन गोळ्या झाडल्या. यावेळी त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या रक्षकांनी पुढाकार घेतल्यानंतर मोटरसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी पळ काढला. गोळीबारात गाडीत बसलेले अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक रथ यांना तीन गोळ्या लागल्या. त्यांच्या गाडीचे चालकही यात जखमी झाले. हल्ल्यानंतर जखमी स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ तसेच जखमी कारचालकाला जवळच्या रूग्णालयात नेण्यात आले. तेथे रथ यांना मृत घोषित करण्यात आले. जखमी कारचालकावर उपचार सुरू आहेत. सुवेंदू अधिकारी यांना ही घटना कळताच ते या रूग्णालयात पोहोचले आहेत.

बंगालमध्ये निकालानंतर रक्तपात!

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्याच्या विविध भागांतून भीषण हिंसाचाराच्या बातम्या येत आहेत. गेल्या २४ तासांत राजकीय संघर्षात ४ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी पक्षाची कार्यालये जाळण्यात आली असून ‘बुलडोझर’ कारवाईमुळे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. निवडणूक निकालानंतर सुरू झालेल्या या हिंसेत आतापर्यंत ४ कार्यकर्त्यांनी आपला जीव गमावला आहे. यामध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांच्या प्रत्येकी २ कार्यकर्त्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, एका भाजप आमदाराच्या भावाचीही हत्त्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या हत्त्यांमुळे संबंधित भागात प्रचंड दहशतीचे वातावरण आहे. पश्चिम बंगालमधील ही हिंसा थांबवण्यासाठी राज्यपाल आणि प्रशासनाकडून शांततेचे आवाहन केले जात आहे, तरीही जमिनीवर परिस्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही. निवडणूक हिंसाचार प्रकरणात, निवडणूक आयोगानेही सख्त कारवाईचे आदेश दिले आहेत.

सुरक्षा दलांवर गोळीबार; ५ जवान जखमी

केवळ राजकीय नव्हे, तर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात असलेल्या सुरक्षा दलांवरही हल्ले झाले आहेत. आंदोलक आणि उपद्रवी घटकांनी केलेल्या गोळीबारात ५ जवान जखमी झाले आहेत. या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेनंतरच्या सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

तृणमूल कार्यालयावर ‘बुलडोझर’ कारवाई आणि जाळपोळ

राज्यात मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून दोन प्रमुख घटना समोर आल्या आहेत. आसनसोल (उत्तर) भागात, कोर्ट मोड येथील तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयाला रात्री उशिरा आग लावण्यात आली. या जाळपोळीनंतर आसनसोलमध्ये तणाव वाढला असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बुलडोझरचा वापरही वादाचा विषय ठरला आहे. भाजप कार्यकर्त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यालयावर बुलडोझर फिरवून ते जमीनदोस्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, यावरून दोन्ही पक्षांत ‘राजकीय युद्ध’ सुरू झाले आहे.

राजकीय आरोप-प्रत्यारोप

  • टीएमसीचा आरोप: “निवडणुकीनंतर भाजप सूडबुद्धीने आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करत आहे. अनेक ठिकाणी पक्षाची कार्यालये उद्ध्वस्त केली जात आहेत,” असा आरोप तृणमूलने केला आहे.
  • भाजपचा इन्कार: भाजपने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “या हिंसेत आमचेही कार्यकर्ते मारले गेले आहेत. तृणमूल स्वतःच्या अंतर्गत वादातून हे करत असून भाजपला नाहक बदनाम केले जात आहे,” असे प्रत्युत्तर भाजपने दिले आहे.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content