मुंबईतल्या चेंबूर जिमखान्याच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत तिसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटाच्या पहिल्या फेरीत पुण्याच्या रोहित मिरजकरने मुंबईच्या श्रीकृष्ण प्रधानचा २५-०, २०-१८ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
तत्पूर्वी चेंबूर जिमखान्याच्या अध्यक्ष बाळकृष्ण वाधवान यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी चेंबूर जिमखान्याचे मानद सरचिटणीस डॉ. मनिष शर्मा, प्रशासकीय मानद सरचिटणीस श्याम अगरवाल, सल्लागार सुरिंदर शर्मा, कॅरम विभाग सचिव बाळकृष्ण परब, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अभय हडप तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर, मानद सचिव अरुण केदार, खजिनदार अजित सावंत व सहसचिव केतन चिखले आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरुष एकेरी गटाचे इतर निकाल पुढीलप्रमाणे-
बाळकृष्ण मते (ठाणे) वि वि राकेश शेट्ये (मुंबई उपनगर) २५-७, २४-५
आतिष कल्याणकर (रायगड) वि वि सुदर्शन पैठणकर (मुंबई उपनगर) २५-०, २०-१६
मनोज बेकार (मुंबई) वि वि संजीव मुळगावकर (पालघर) २५-१४, १२-९
प्रशांत म्हात्रे (सिंधुदूर्ग) वि वि उदय बने (मुंबई उपनगर) २५-११, ३-२५, २५-३
हर्षद डांगी (मुंबई उपनगर) वि वि कलीम अहमद अन्सारी (धुळे) ०-२५, २५-१९, २३-१३
अमर भोसले (मुंबई उपनगर) वि वि विक्रांत नाईक (मुंबई) १७-९, १-२५, २५-६
संतोष जाधव (मुंबई) वि वि रईस शेख (जळगाव) २२-१२, २५-१०
निरंजन चारी (पालघर) वि वि महर्षी देसाई (मुंबई उपनगर) २५-०, २५-९
अब्दुल शेख (मुंबई उपनगर) वि वि दयानंद चोथे (ठाणे) २५-११, १३-१७, २५-१६
मेहराज शेख (नाशिक) वि वि रमेश ह्सगेकर (मुंबई उपनगर) २५-०, २५-०