Homeकल्चर +पद्मावती शाळीग्राम-गोखले यांची...

पद्मावती शाळीग्राम-गोखले यांची मैफल येत्या रविवारी!

मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी “स्वरसंचित” या शीर्षकाअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या जुन्या ध्वनिमुद्रित मैफिलीच्या उपक्रमाअंतर्गत रविवार दिनांक ११ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता जयपूर अत्रौली घराण्याच्या ख्यातनाम गायिका विदुषी पद्मावती शाळीग्राम-गोखले यांची ध्वनिमुद्रित मैफल सादर होणार आहे.

कजरी, होरी, चैती सादर करण्याची त्यांची खासियत आहे. संगीत नाटक पुरस्कार, कालीदास पुरस्कार, तानसेन पुरस्कार इ. पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते. यू ट्यूब प्रणालीवरून प्रसारित होणाऱ्या या मैफलीची लिंक कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी रसिकांना दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या www.dadarmatungaculturalcentre.org या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. तरी गानरसिकांनी या मैफलीचा बहुसंख्येने आनंद घ्यावा असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

Continue reading

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...
Skip to content