Homeचिट चॅटदिव्यांग प्रवाशांना मेट्रो...

दिव्यांग प्रवाशांना मेट्रो प्रवासात संपूर्ण सवलत द्या!

राज्यातील एसटी महामंडळात महिला प्रवाशांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे आणि उर्वरित ५० टक्के रक्कम शासनाकडून एसटी महामंडळाला परतावा स्वरूपात दिली जाते. या धर्तीवरच दिव्यांग प्रवाशांसाठीही मेट्रो प्रवासात अशाच प्रकारची सवलत द्यावी, अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार आणि ‘पत्रकार रुग्णमित्र’ म्हणून ओळखले जाणारे दीपक कैतके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मुंबई मेट्रो प्रशासनाकडे केली आहे.

कैतके यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, मेट्रो स्थानकांमध्ये व गाड्यांमध्ये दिव्यांग अनुकूल सुविधा अद्याप पूर्णपणे उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेक दिव्यांग प्रवाशांना प्रवास करताना सहकारी व्यक्तीची मदत घ्यावी लागते. या अतिरिक्त अडचणींचा विचार करता, दिव्यांग बांधवांना मेट्रो प्रवासात संपूर्ण सवलत देणे केवळ सामाजिक न्यायाचे नव्हे, तर मानवी दायित्वाचे

पाऊल ठरेल. राज्यशासनाने महिला प्रवाशांसाठी केलेल्या निर्णयाप्रमाणेच दिव्यांग प्रवाशांसाठीही परतावा स्वरूपात मेट्रो प्रशासनाला आर्थिक मदत देऊन ही सवलत शक्य करावी. दिव्यांगांना दिली जाणारी सवलत ही त्यांच्या शारीरिक मर्यादेची जाणीव ठेवून सन्मानपूर्वक दिलेली मदत ठरावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

दिव्यांग व्यक्तींना प्रवासात सुलभता व सन्मान मिळावा, यासाठी दीपक कैतके यांनी सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा सुरू ठेवला आहे. त्यांच्या या मागणीला सामाजिक क्षेत्रातूनही मोठा पाठिंबा मिळत असून, शासनाने यावर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी वाढू लागली आहे.

Continue reading

राष्ट्रीय स्लिंगशॉट स्पर्धेत गौरव मोकाशींना सुवर्णपदक

१४वी राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिप-२०२६ स्पर्धा छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ४० ते ४५ वर्षे वयाच्या गटात दहिसर, मुंबईचे गौरव मोकाशी यांनी सुवर्णपदक पटकावले. या आधीच्या राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिपमध्ये त्यांना रौप्यपदक मिळाले होते....

येत्या रविवारी आस्वाद घ्या ‘त्रिधा’चा

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने आंतरराष्ट्रीय संगीत दिनाच्या निमित्ताने एक विशेष संगीत कार्यक्रम ‘त्रिधा’ सादर होणार आहे. येत्या रविवारी, १८ ऑक्टोबरला सायंकाळी साडेपाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाची संकल्पना प्रसिद्ध तबलावादक पं. विजय घाटे यांची...

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...
Skip to content