Homeन्यूज ॲट अ ग्लांसपंतप्रधान नरेंद्र मोदी...

पंतप्रधान नरेंद्र मोदी @ 74!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आपला 74वा वाढदिवस साजरा करत असून आजच त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील सरकारला शंभर दिवस पूर्ण होत आहेl. यानिमित्त आज पंतप्रधान मोदी ओरिसामध्ये घरांच्या एका भव्य योजनेचे भूमिपूजन करणार आहेत.

देशभरात भारतीय जनता पार्टीकडून आज पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस ठिकठिकाणी साजरा केला जात आहे. भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी यानिमित्त एका भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त काशी विश्वनाथ मंदिरात पूजा करणार आहेत.

पंतप्रधान

मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील 100 दिवस पूर्ण झाल्याबद्दल आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि गेल्या शंभर दिवसांमध्ये केंद्र सरकारने केलेल्या कामगिरीचा आढावा घेतला. या काळात 15 लाख कोटींच्या विविध योजना चालू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी गुजरातमधल्या एका लहानशा खेड्यातल्या गरीब परिवारात जन्मलेले व्यक्तिमत्व असून गेली तीस वर्षे ते भारतीय राजकारणात महत्त्वाची पदे भूषवत आहेत. गेल्या दहा वर्षांपासून ते पंतप्रधान राहिलेले आहेत. हे त्यांचे अकरावे वर्ष आहे. साठ वर्षांनंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारे मोदी हे पहिले नेते आहेत. 14 विविध देशांचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कदाचित जगातले पहिलेच पंतप्रधान असतील.

Continue reading

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...

मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता

मुंबईतल्या आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे एमएससी बँक पुरस्कृत मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत शेठ करमशी कानजी इंग्लिश स्कूलचा केवल कुळकर्णी विजेता ठरला. अटीतटीच्या अंतिम आठव्या फेरीत डावाच्या मध्यापर्यंत १०-० अशी आघाडी घेणाऱ्या उमैर पठाणला...
Skip to content