Homeएनसर्कलपोप फ्रान्सिस यांच्यावरील...

पोप फ्रान्सिस यांच्यावरील अंत्यसंस्कारात राष्ट्रपती मुर्मू सहभागी

रोमन कॅथोलिक ख्रिश्चन समाजाचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रन्सिस यांचे २१ एप्रिलला वयाच्या ८८व्या वर्षी निधन झाले. काल रोममधल्या व्हॅटिकन सिटीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यावेळी व्हॅटिकन सिटीमधील सेंट पीटर स्क्वेअर येथे पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्काराच्या प्रार्थनेत सहभागी झाल्या. पोप यांच्यावरील अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या अधिकृत भारतीय शिष्टमंडळाचा भाग असलेले केंद्रीय संसदीय कार्य आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू, अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री जॉर्ज कुरियन आणि गोवा विधानसभेचे उपाध्यक्ष जोशुआ डिसुझा हेही यावेळी उपस्थित होते.

पोप फ्रान्सिस यांची समाजसेवा कायम स्मरणात राहील – पंतप्रधान मोदी

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांच्यावरील अंत्यसंस्काराच्या निमित्ताने एक्सवर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, भारतीय जनतेच्या वतीने राष्ट्रपतीजींनी परमपूज्य पोप फ्रान्सिस यांना आदरांजली वाहिली आहे. पोप फ्रान्सिस यांनी समाजासाठी केलेली सेवा, जगाच्या कायम स्मरणामध्‍ये राहील. जग त्यांच्या समाजसेवेचे कायम स्मरण करेल.

Continue reading

युरोपातल्या युद्धाची वाढती तीव्रता जगासाठी तापदायक!

गेल्या 24 तासांत जगभरात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडल्या आहेत, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तणाव वाढला आहे. एकीकडे भू-राजकीय संघर्ष तीव्र होत असताना, दुसरीकडे जागतिक अर्थव्यवस्थेतील बदल आणि हवामान बदलाच्या गंभीर इशाऱ्यांनी जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. युरोपमधील युद्धाची तीव्रता, पूर्व...

सूर्यवंशी क्षत्रिय समाज क्रिकेट स्पर्धा 18 नोव्हेंबरपासून

मुंबईच्या सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाजाच्यावतीने सीझन क्रिकेटची एस के सी एल टी-२० स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या लीगमध्ये सहा संघ भाग घेत आहेत. 18 नोव्हेंबरला या स्पर्धेची सुरुवात होणार असून अंतिम सामना 28 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. 196...

मुंबई विमानतळावर 17.18 कोटींचे कोकेन जप्त

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई विभागीय युनिटने, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल एन्टेबे (युगांडा) येथून आलेल्या एका टांझानियन महिला प्रवाशाकडून 1718 ग्रॅम कोकेन जप्त केले. जप्त केलेल्या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजे किंमत 17.18 कोटी रुपये आहे. मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या...
Skip to content