Homeएनसर्कल15 जूनपासून घाऊक...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले आर्थिक सल्लागार कार्यालय येत्या 15 जूनला दुपारी 12 वाजता आधारभूत वर्ष 2022-23सह डब्ल्यूपीआयची सुधारित मालिका जारी करेल. ही मालिका आधारभूत वर्ष 2011-12सह आताच्या सर्व डब्ल्यूपीआय मालिकेची जागा घेईल.

हे कार्यालय यावेळीच उत्पादन उत्पादकमूल्य निर्देशांक (ओपीपीआय), प्रायोगिक निविष्ठा उत्पादकमूल्य निर्देशांक (आयपीपीआय) आणि बँकिंग, सुरक्षा ठेवींचे व्यवहार, विमा, निवृत्तीवेतन निधीचे व्यवस्थापन, रेल्वे, हवाई वाहतूक (प्रवासी) आणि दूरसंचार अशा सात प्रकारच्या सेवांसाठी सेवा प्रदाता उत्पादकमूल्य  निर्देशांक (सर्व्हिस पीपीआय) यांची आधारभूत वर्ष 2022-23 असलेली नवी मालिकादेखील जारी करणार आहे. मूल्यवाढीच्या कलमांमध्ये डब्ल्यूपीआयचा वापर विचारात घेता, हा निर्देशांक, 15 जूनपासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी पीपीआयसह जारी करण्यात येईल आणि त्यानंतर त्याचा वापर थांबवण्यात येईल. यामुळे वापरकर्त्यांना डब्ल्यूपीआयकडून पीपीआयकडे वळण्यासाठी पुरेसा कालावधी मिळेल. डब्ल्यूपीआयकडून पीपीआयकडे होणारे हे स्थित्यंतर प्रगत अर्थव्यवस्थांनी जागतिक पातळीवर स्वीकारलेल्या सर्वोत्तम पद्धती आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या शिफारसींना अनुरूप आहे. डब्ल्यूपीआय आणि उत्पादन पीपीआय हे मासिक तत्त्वावर संकलित करण्यात येत आहेत आणि 15 जूनला एप्रिल 2023पासून एप्रिल 2026पर्यंतच्या 37 महिन्यांच्या कालावधीतल्या आधीच्या मालिकांसह मे 2026 या महिन्यासाठी (तात्पुरत्या स्वरूपातले) उपलब्ध करून दिले जातील.

नवीन डब्ल्यूपीआय (2022-23) मालिकेची ठळक वैशिष्ट्ये:

  1. वस्तूंची वाढलेली संख्या: वस्तूंची संख्या वाढवून 697वरुन 957 करण्यात आली आहे.
  2. विजेच्या गटांतर्गत नवीन आणि नूतनीकरणीय ऊर्जेचा समावेश: ‘वीज’ गटामध्ये सौर आणि पवन यांसारख्या नव्या ऊर्जा स्त्रोतांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर या गटामध्ये आण्विक विद्युतनिर्मितीचादेखील समावेश करण्यात आला आहे.
  3. ऊर्जेच्या किंमतींचा मागोवा घेण्यासाठी सुसंगत आणि एकात्मिक संरचना: कच्चे पेट्रोलियम पदार्थ आणि नैसर्गिक वायू यांना ‘प्राथमिक वस्तूं’च्या गटाकडून ‘इंधन आणि वीज’ या गटाकडे स्थानांतरित करण्यात आले आहे. या गटामध्ये आधीपासूनच कोळसा, वीज आणि पेट्रोलियम उत्पादनांसारखी इतर प्रमुख इंधने समाविष्ट असल्यामुळे सदर पुनर्रचनेमुळे अधिक सुसंगतता येईल.
  4. वजनांच्या व्युत्पत्तीसाठी सुधारित पद्धत
  5. संगणनाची सुधारित पद्धत
  6. किंमतविषयक माहितीतील त्रुटी दूर करण्यासाठी सुधारित पद्धत
  7. जोडणारे घटक

डब्ल्यूपीआय, उत्पादन पीपीआय आणि सेवा पीपीआय हे मुलभूत किंमतीच्या आधारावर संकलित करण्यात येतात, तर उद्योग बाजारपेठांमधून निविष्ठा खरेदी करत असल्यामुळे निविष्ठा पीपीआय हा खरेदीदाराच्या किमतीनुसार संकलित करण्यात येतो.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content