Homeकल्चर +‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे...

‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे पोस्टर झाले रिलीज!

भारतीय इतिहासातील जाज्वल्य नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज! स्वराज्य स्थापनेचा तो विलक्षण प्रवास आणि महाराजांचे उत्तुंग व्यक्तिमत्व पुन्हा एकदा एका भव्य स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित, ‘राजा शिवाजी’ या द्वैभाषिक (मराठी आणि हिंदी) चित्रपटाचे अधिकृत पोस्टर शिवजयंतीच्या प्रदर्शित करण्यात आले. इतिहास साक्षी आहे त्या अढळ निष्ठेचा आणि अजेय शौर्याचा. एक अशी गाथा, जी केवळ कथा नाही तर आहे ‘एक वचन, एक स्वराज्य, एका संपूर्ण राष्ट्राचा अभिमान’.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या सिनेमा पोस्टरमध्ये अभिनेते-दिग्दर्शक रितेश देशमुख हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात अत्यंत प्रभावशाली दिसत आहेत. त्यांच्या हातात फडकणारा भगवा ध्वज, चेहऱ्यावरील करारी भाव आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवर उभे असलेले त्यांचे व्यक्तिमत्व महाराजांच्या शौर्याची प्रचिती देते. पोस्टरमधील सुवर्णाक्षरातील चित्रपटाचे नाव आणि तेजस्वी प्रकाशयोजना या ऐतिहासिक गाथेच्या भव्यतेची साक्ष देते. हा भव्य ऐतिहासिक ॲक्शन-ड्रामा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, त्याग आणि दूरदृष्टीला मनःपूर्वक वंदन करणारी सिनेमॅटिक कलाकृती आहे. अन्यायाच्या अंधाराला छेद देत स्वराज्याच्या प्रकाशासाठी झुंज देणाऱ्या राजाच्या या अद्वितीय प्रवासाचे सशक्त चित्रण या चित्रपटातून साकारले आहे.

या चित्रपटात मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांची भक्कम फौज एकत्र पाहायला मिळणार आहे. सिनेमाच्या संगीतात भारतीय चित्रपटसृष्टीतील संगीतसम्राट अजय–अतुल यांची जादू अनुभवायला मिळणार असून, प्रसिद्ध छायाचित्रकार संतोष सिवन या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. यामुळे हा चित्रपट फक्त इतिहासाची कथा नसून, उत्कृष्ट अभिनय, भव्य दृश्यात्मक मांडणी आणि सांस्कृतिक गौरवाचा जागतिक स्तरावरील सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे. हा चित्रपट, पिढ्यानपिढ्यांना प्रेरणा देणाऱ्या स्वराज्य विचारांचा उत्सव ठरणार आहे. निर्माते ज्योती देशपांडे आणि जिनिलीया देशमुख, रितेश देशमुख दिग्दर्शित, ‘राजा शिवाजी’ १ मे २०२६ रोजी म्हणजेच ‘महाराष्ट्र दिना’च्या दिवशी जगभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. यानिमित्ताने शिवरायांच्या पराक्रमाची गाथा आंतरराष्ट्रीय पातळीवरही विस्तारित होण्यास सज्ज आहे, असे ज्येष्ठ पत्रकार व समाजसेवक के. रवि (दादा) यांनी सांगितले.

Continue reading

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...

मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता

मुंबईतल्या आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे एमएससी बँक पुरस्कृत मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत शेठ करमशी कानजी इंग्लिश स्कूलचा केवल कुळकर्णी विजेता ठरला. अटीतटीच्या अंतिम आठव्या फेरीत डावाच्या मध्यापर्यंत १०-० अशी आघाडी घेणाऱ्या उमैर पठाणला...
Skip to content