Homeचिट चॅटराज्य कॅरम स्पर्धेत...

राज्य कॅरम स्पर्धेत पंकज आणि काजलची बाजी!

मुंबईच्या रोटरी क्लब ऑफ पार्लेश्वर आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती जुहू यांच्या सहयोगाने आयोजित केलेल्या उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत ५व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत अनुक्रमे पंकज पवार आणि काजल कुमारीने बाजी मारली.

पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या पंकज पवारने दोनवेळा विश्वचषकावर नाव कोरलेल्या व तीनवेळा राष्ट्रीय विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबईच्या प्रशांत मोरेविरुद्ध पहिला सेट १६-२५ असा गमावला होता. दुसऱ्या सेटमध्ये पाचव्या बोर्डनंतर ११-१२ अशी १ गुणांची पिछाडी असताना सातव्या बोर्डात व्हाईट स्लॅमची नोंद करत पंकजने ११ गुणांची कमाई केली आणि आघाडी घेतली. हा सेट पंकजने २५-१४ असा जिंकून सामन्यात रंगत आणली. तिसऱ्या आणि शेवटच्या सेटमध्ये पुन्हा एकदा सहाव्या बोर्डानंतर पंकज १६-२० असा ४ गुणांनी पिछाडीवर होता. मात्र त्याने सातव्या बोर्डात १० गुणांची कमाई करत हा सेट २५-२० असा जिंकून आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तत्पूर्वी अंतिम फेरीत प्रवेश करताना पंकजने पुण्याच्या अभिजित त्रिपनकरला तर प्रशांतने मुंबईच्या सिद्धांत वाडवलकरला हरवले होते.

महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या काजल कुमारीने रत्नागिरीच्या आकांक्षा कदमला हरवून विजय नोंदविला. तिसऱ्या सेटमध्ये सातव्या बोर्डनंतर काजलकडे केवळ ३ गुणांची आघाडी होती. परंतु ब्रेकचा फायदा घेत अनुभवी काजलने शेवटचा बोर्ड दोनचा मिळविला आणि निसटता विजय प्राप्त केला. अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या काजलने मुंबई उपनगरच्या प्राजक्ता नारायणकरला तर ठाण्याच्या समृद्धी घाडिगावकरला पराभूत केले होते.

पुरुषांच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत सिद्धांत वाडवलकरने अभिजित त्रिपनकरला तर महिलांच्या तिसऱ्या क्रमांकासाठीच्या लढतीत समृद्धी घाडिगावकरने प्राजक्ता नारायणकरला पराभूत केले.

विजेत्यांना रोटरी क्लब ३१४१ शाखेचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. मनिष मोटवानी व सचिव भालचंद्र बर्वे, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे डायरेक्टर नागेश पिंगे, प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे विश्वस्त मकरंद येडुलकर, रोटरी क्लब पार्लेश्वर मुंबईचे अध्यक्ष अविनाश मिश्रा, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार, मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष चव्हाण आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना रोख पारितोषिके, चषक व प्राविण्य प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. महिला व पुरुष विजेत्यांनी रोख रुपये २५ हजारांची कमाई केली.

Continue reading

इराकमधून अमेरिकेची संपूर्ण सैन्यवापसी!

अमेरिकेने इराकमधून आपले सर्व सैन्य माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला असून, ३० सप्टेंबर २०२६पर्यंत सर्व अमेरिकन सैनिक मायदेशी परततील. इराकचे पंतप्रधान मोहम्मद शिया अल-सुदानी आणि अमेरिकन सेंट्रल कमांड यांच्यात झालेल्या चर्चेनंतर या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या माघारीमुळे २००३मध्ये...

केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा रुग्णालयात दाखल

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल, १३ ऑगस्टच्या सायंकाळी जे. पी. नड्डा यांना अचानक...

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...
Skip to content