हेल्थनोवो ही एक उदयोन्मुख आरोग्यसेवा असून महाराष्ट्रातील प्राथमिक आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी काम करत आहे. हेल्थनोवोने एक वैद्यकीय उपकरण तयार केले आहे जे कोलेस्ट्रॉल, रक्तातला ग्लुकोज, हिमोग्लोबिन, युरिक ऍसिड आणि इतर महत्त्वाच्या तपासणी चाचण्या अवघ्या ५ मिनिटांत करू शकेल.
ही सेवा तंत्रज्ञानावर आधारित असून सर्वसामान्यांना सहजरित्या परवडण्याजोगी आहे. यातूनच हेल्थनोवोने आरोग्य एटीएम ही संकल्पना रुढ केली असून त्या अंतर्गत वेगवेगळ्या चाचण्या अत्यंत कमी वेळेत अधिक परिणामकारकरित्या करता येतात. ही सेवा सोयीच्या वेळेत आणि महाराष्ट्रातील अधिकाधिक भागात घेणे शक्य होत आहे. याअंतर्गत रायगड जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अशा १० हेल्थ एटीएम सुरु आहेत, जेणेकरून वेगवेगळ्या तालुक्यांना स्क्रीनिंगची सुविधा उपलब्ध देण्याची योजना आहे. त्यात डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचारी यांचा समावेश आहे.
या उपक्रमातून तालुका स्तरावर स्क्रीनिंग डायग्नोस्टिक सुविधा मिळणे सहज शक्य होत आहे. या मशीन ५ मिनिटांत निकाल देतात. साध्या रक्त चाचण्यांचे निकाल मिळविण्यासाठी आता २ किंवा ३ दिवसांची प्रतिक्षा इथल्या नागरिकांना करावी लागत नाही. हेल्थनोव्हो आता विविध जिल्ह्यांमध्ये हेल्थ एटीएम बसवून संपूर्ण महाराष्ट्रात आपले पाऊल विस्तारणार आहे.