Homeचिट चॅट१४ व १५...

१४ व १५ मे रोजी मुंबईत रंगणार अ. भा. महापौर केसरी कुस्ती स्पर्धा

बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई शहर तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ३२वी अखिल भारतीय मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२६चे आयोजन करण्यात आले असून, देशभरातील नामांकित मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ही प्रतिष्ठेची स्पर्धा १४ व १५ मे २०२६ रोजी भारतीय क्रीडा मंदिर, नारायण क्रॉस रोड, वडाळा, मुंबई येथे रंगणार आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमुळे मुंबईतील कुस्तीप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्पर्धेमध्ये विविध वजन गटांमध्ये सामने होणार असून विजेत्या मल्लांना आकर्षक रोख बक्षिसे, चषक व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहेत.

महापौर केसरी गटात ८२ किलोपेक्षा अधिक वजन गटासाठी प्रथम क्रमांकाला तब्बल १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. तसेच द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांकासाठी अनुक्रमे ५१ हजार, ३२ हजार आणि २२ हजार रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. ५० ते ६० किलो वयोगटातील (१७ वर्षांखालील) मल्लांसाठीही स्वतंत्र गट ठेवण्यात आला असून त्यात प्रथम क्रमांकासाठी २५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. याशिवाय कोकण विभागातील (मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, कल्याण, पालघर, रायगड) कुस्तीगीरांसाठी विशेष गट राखीव ठेवण्यात आले आहेत. ५५ ते ६२ किलो, ६२ ते ७२ किलो आणि ७२ ते ८२ किलो अशा विविध वजन गटांमध्ये स्पर्धा होणार असून विजेत्यांना रोख पारितोषिकांसह चषक व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

स्पर्धेचा उद्घाटन सोहळा १४ मे रोजी सायंकाळी ६ वाजता होणार असून त्यानंतर कुस्ती सामने रंगणार आहेत. १५ मे रोजी सकाळपासून अंतिम सामने व बक्षीस वितरण समारंभ पार पडणार आहे. खासकरुन १५ मे रोजी सायंकाळी बक्षीस वितरण समारंभप्रसंगी मुंबईच्या महापौर रितु राजेश तावडे तसेच उपमहापौर संजय घाडी उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे नियम लागू राहणार असून सहभागी स्पर्धकांनी आधारकार्डाची मूळ प्रत व चार फोटो सोबत आणणे बंधनकारक करण्यात आले आहे. १७ वर्षांखालील कुमार गटातील स्पर्धकांसाठी वयोमर्यादा ३१ मे २०२६पर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

स्पर्धकांच्या निवास व भोजनाची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. अधिक माहितीसाठी मुंबई शहर तालीम संघाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही कुस्ती स्पर्धा कुस्ती हेच जीवन, या अधिकृत युट्यूब चॅनेलवर लाईव्ह दाखवली जाणार आहे. अधिक माहितीसाठी प्रकाश तानवडे (सरचिटणीस मुंबई शहर तालीम संघ – 9821717835, 8789857454) यांच्याशी संपर्क साधावा. या स्पर्धेकरीता पै. सुरेश जाधव, चिंचोली निवेदकाचे काम करणार आहेत. हलगीवादन रणजित साठे, वाटेगाव करतील, असे पै. संपत पाटील, यांनी कळविले आहे.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content