Homeन्यूज ॲट अ ग्लांसअखिलेश यादवचे बंधू...

अखिलेश यादवचे बंधू प्रतिक यांचा संशयास्पद मृत्यू!

समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे लहान पुत्र तसेच समाजवादी पार्टीचे सध्याचे प्रमुख अखिलेश यादव यांचे लहान सावत्र बंधू प्रतिक यादव यांचे आज पहाटे वयाच्या ३८व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या अपर्णा यादव यांचे ते पती होत. आज पहाटे अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांचे मित्र तसेच मेव्हण्याने प्रतिक यांना लखनौच्या रुग्णालयात नेले. पण, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांची प्राणज्येत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी अपर्णा तसेच दोन मुली आहेत. आकस्मिक मृत्यू झाल्यामुळे त्यांचे पार्थिव सध्या शवचिकित्सेसाठी लखनौच्या केजीएमयु रुग्णालयात नेण्यात आले आहे. चार डॉक्टरांचे पथक शवचिकित्सा करतील. यावेळी व्हिडिओग्राफीही केली जाणार आहे. त्यानंतर प्रतिक यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे सांगण्यात आले. त्यांना विषबाधा झाल्याचा संशयही व्यक्त होत आहे.

पहाटे चार वाजून ५५ मिनिटांनी ते घराच्या स्वयंपाकघरात खाली कोसळलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, जेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. दोन वर्षांपासून ते मूत्राशयाच्या (किडनी) विकाराने आजारी होते. आठ दिवसांपूर्वीच त्यांच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. प्रतिकचे राजकारणाशी काही देणेघेणे नव्हते. मात्र, त्यांच्या पत्नी अपर्णा पूर्वी समाजवादी पार्टीत सक्रीय होत्या. नंतर त्या भाजपात गेल्या. सध्या त्या उत्तर प्रदेश महिला आयोगाच्या उपाध्यक्ष आहेत. भटक्या कुत्र्यांना सांभाळणारी जीव, नावाची एक सामाजिक संस्था ते चालवत होते. लखनौत त्यांचे दि फिटनेस प्लॅनेट, नावाची प्रशस्त अशी व्यायामशाळाही आहे. महागड्या गाड्या फिरवण्याचा त्यांचा शौक होता. स्वतःच्या फिटनेसबद्दल ते कायम सजग असायचे. ३० एप्रिलला ते मेदांता रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाले होते. ३ मे रोजी रुग्णालयाने डिस्चार्ज दिला नसतानाही स्वतःच्या मर्जीने ते घरी गेले होते, असे समजते.

प्रतिकच्या निधनाचे वृत्त समजताच अखिलेश यादव यांनी तातडीने त्यांच्या घरी धाव घेतली आणि आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रतिकचा निपचित पडलेला देह पाहून अखिलेश यादव यांना शोक अनावर झाला. ते ओक्साबोक्सी रडत होते, असे माहितगारांनी सांगितले. प्रतिक यांच्या पत्नी अपर्णा यादव रात्री दिल्लीतच होत्या. घटनेचे वृत्त कळताच त्या तातडीने लखनौला रवाना झाल्या आहेत. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, प्रतिक यांना रुग्णालयात नेण्यात येण्याआधी त्यांच्या गाडीचा चालक रुग्णालयात गेला होता. तेथे त्याने, भैय्या की तबियत बहोत बिगड गई है, असे सांगितले. प्रतिकच्या डोळ्याच्या रंगात तसेच नखांच्या रंगात बदल झाल्याचेही समजते. गेल्या काही काळापासून प्रतिक आणि अपर्णा यांच्यात पारिवारिक तणाव होता. अपर्णा वेगळ्याही राहत होत्या, असे कळते.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी, अखिलेश यादव यांनी समाजमाध्यमाद्वारे प्रतिक लयांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

Continue reading

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...

मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता

मुंबईतल्या आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे एमएससी बँक पुरस्कृत मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत शेठ करमशी कानजी इंग्लिश स्कूलचा केवल कुळकर्णी विजेता ठरला. अटीतटीच्या अंतिम आठव्या फेरीत डावाच्या मध्यापर्यंत १०-० अशी आघाडी घेणाऱ्या उमैर पठाणला...
Skip to content