Homeब्लॅक अँड व्हाईटयेथे प्रत्येक छायाचित्र...

येथे प्रत्येक छायाचित्र बोलते…

“For me the subject of the picture is always important than the picture” हा सुविचार दिवंगत छायाचित्रकार रजनीश काकडे यांनी काढलेल्या छायाचित्र प्रदर्शनात प्रकर्षाने जाणवत होता. रजनीशला आदरांजली वाहण्यासाठी मुंबई प्रेस क्लबने त्याच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतेच केले. याप्रसंगी खासदारद्वय अरविंद सावंत, संजय राऊत, पक्षसचिव, आमदार मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. प्रेस क्लबचे अध्यक्ष समर खडस यांनी सर्वांचे स्वागत केले. आपल्याकडील पत्रकारितेत छायाचित्रकाराला म्हणावे तसे महत्त्व दिले जात नाही, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

प्रकाशाची संवेदनाशीलता!

छायाचित्रण म्हणजे प्रकाशाची जणू संवेदनाशीलता असल्याचे सांगून उद्धवजी म्हणाले की, छायाचित्रकाराकडे भावना असावी लागते. या भावनेचे परावर्तन तो आपल्या छायाचित्रातून करत असतो. हातातील कॅमेरा साधा असो वा महागडा, तुमच्या डोळ्यात भावना असेल तर निर्जीव वस्तूतूनही सजीव साकारता येते! रजनीश काकडे यांच्या छायाचित्रांची प्रदर्शने राज्यात इतत्रही भरवली जावीत, असे आवाहन करून त्यांनी काकडे यांच्या छायाचित्रांचे कॉफीटेबलबुक तयार करावे असेही सुचवले!

वडिलांचा गुण उतरला

रजनीश काकडे यांचे पिताजी मंदार काकडे हेही एक नावाजलेले छायाचित्रकार होते, याची आठवण करून देऊन खासदार संजय राऊत यांनी वडिलांचाच ‘डोळा’ घेऊन रजनीश या क्षेत्रात उतरले होते, असे सांगितले. यावेळी राऊत यांनी सांगलीच्या आनंदराव सूर्यवंशी यांच्या लोकमंचातील एका लोक कलाकाराने डोक्यावर (खरंतर डोक्याने) नारळ आपटून फोडला होता तो प्रसंग नारळाच्या तुषारांसह मंदारजींनी टिपला होता. रजनीशच्या या प्रदर्शनात त्याचे काही नमुनेही दिसले, असे गौरवपर उद्गार त्यांनी काढले. याप्रसंगी रजनीश यांचे वडीलबंधू राजू काकडे हेही उपस्थित होते.

प्रदर्शनात ‘डोळा’ दिसतोय!

‘आय डॅट नेव्हर क्लोजेस’.. छायाचित्रकाराचे डोळे कधीच बंद होत नसतात. (छायाचित्र घेताना तुम्हाआम्हाला तो डोळे मिटतोय हे दिसत असूनही) याचा प्रत्यय या छोटेखानी प्रदर्शनात नक्कीच येत होता. गणपतीविसर्जन, दहशतवादी हल्ला, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवतीर्थावरील प्रचंड सभा, आंदोलनातील मोर्चा, मस्त्यालयातील एका फिश टँकमधील कुतूहलमिश्रित निरागसतेने पण डोळ्यात आनंद साठवणारा तो अनामिक मुलगा प्रदर्शनाबाहेर आलो तरी डोळ्यासमोरून जात नव्हता. हीच रजनीशची खरी किमया आणि कमाई. या प्रदर्शनातून आणखी एक गोष्ट मनात ठसली- “A good photographer is knowing where to stand” तसेच “When you photograph a face you photograph the soul behind it” हेही दिसून आले व भावलेही!

शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धवजी या प्रदर्शनाच्या निमित्ताने सुमारे दोन-अडीच तास प्रेस क्लबमध्ये होते. त्यांनी पत्रकार व छायाचित्रकारांशी चर्चा केली. यानिमित्ताने एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ती म्हणजे कुणी काहीही म्हणो आमदार मिलिंद नार्वेकर सावलीसारखे पक्षप्रमुखांच्या समवेत होते वा असतात. यावर पुन्हा कधीतरी प्रकाश नक्की टाकणार. आणखी एक महत्त्वाची नोंद करणार आहे. कारण रजनीशच्या आजारपणात त्याच्या कुटुंबियांनी त्याची काळजी घेतलीच. पण, अधिक शुश्रुषा मनीषावहिनींनी घेतली (राजूच्या पत्नी). त्याही यावेळी उपस्थित होत्या. छायाचित्रांच्या प्रदर्शनाबरोबरच मनीषावहिनींच्या चेहऱ्यांवरच्या हावभावांनी मीही गदगदलो!

(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

1 COMMENT

Comments are closed.

Continue reading

‘केइएम’मध्ये मदत कक्षालाच हवी मदत! तपासायला डॉक्टर मिळाला तर उत्तमच!!

मुंबई महापालिकेच्या प्रमुख समजल्या जाणाऱ्या केइएम रुग्णालयात डॉक्टरांसहित कर्मचारी-कामगारांमध्ये सुमारे २० टक्के इतकी मोठी कपात करण्यात आली असून मोडकळीस आलेले स्ट्रेचर्स वगैरे सामान गोदमात ढकलून देण्यासाठीही कामगार नसल्याची संतापजनक माहिती हाती आली आहे. अपघात विभागातील डॉक्टरांची संख्या तर एक-दोन...

मुंबई बॉम्बस्फोटांचे मास्टरमाईंड अंमली पदार्थांच्या फॅक्टरीमागे?

मुंबईच्या आग्रीपाडा पोलीसठाण्याच्या समोरच्या बाजूसच असलेल्या घास गल्लीतील अमली पदार्थांचा कारखाना नार्कोटिक्स विभागाने उद्ध्वस्त केल्यानंतर गेले सुमारे पाच-सहा दिवस दक्षिणमध्य मुंबईतील अनेक भागांना भेटी दिल्यानंतर एक गोष्ट हळूहळू स्पष्ट होत आहे की, या अमली पदार्थांच्या व्यापार व कारखान्यांमागे मुंबईत...

आग्रीपाड्यातली ‘यास्मिन’ आणि पोलिसांचे ‘डोला रे डोला…’!

बुधवारच्या जवळजवळ सर्वच वर्तमानपत्रात 'आग्रीपाडा येथील ड्रग फॅक्टरी उद्ध्वस्त', अशी बातमी वाचली व मन एकदम भूतकाळात गेले. लगेचच मनाशी ठरवले, आज आग्रीपाड्यात जायचेच आणि गेलोही! आग्रीपाडा पोलीसठाण्याच्या दारातच उतरलो. आजूबाजूला नजर टाकली. प्रशस्त रस्ता, गगनचुंबी इमारती.. काही इमारती तर...
Skip to content