Homeटॉप स्टोरीआता मालमत्ता करविषयक...

आता मालमत्ता करविषयक देयके इ-मेलवर!

बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे मालमत्ता करविषयक देयके करदात्यांच्या नोंदणीकृत इ-मेलवर पाठविण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्यासाठी करदात्यांनी महानगरपालिकेच्या https://ptaxportal.mcgm.gov.in/CitizenPortal/ या संकेतस्थळावर जाऊन केवायसी (KYC) फॉर्ममध्ये आपली आवश्यक ती माहिती अद्ययावत करावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे मालमत्ता करदात्यांना जाहीर आवाहन करण्यात येते की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://ptaxportal.mcgm.gov.in/CitizenPortal/ या संकेतस्थळावर जाऊन केवायसी (KYC) फॉर्ममध्ये आपली आवश्यक ती माहिती अद्ययावत करावी, जेणेकरुन मालमत्ता कराविषयी सूचना ई-मेल आणि लघुसंदेश अर्थात एसएमएसद्वारे अवगत करण्यात येईल. मालमत्ता कराचे देयकेसुद्धा करदात्यांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या सुविधेसाठी केवायसी माहिती देणे अनिवार्य आहे.

या सुविधेमुळे महानगरपालिका प्रशासनासह करदात्यांनाही मोठा फायदा होणार आहे. कारण त्यांना मालमत्‍ता कर देयके वेळेत प्राप्‍त होतील. यामुळे वेळेवर करभरणा होऊन दंडाची कारवाई टाळता येईल. सोबतच महानगरपालिकेच्‍या विविध योजनांची माहिती नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांकावर लघुसंदेश (एसएमएस) द्वारे व नोंदणीकृत ई-मेलद्वारे मिळेल. भविष्‍यातील मालमत्‍ता कराविषयक योजनेची माहिती वेळेत मिळेल. त्याचप्रमाणे करदात्यांच्या मालमत्तेत झालेल्‍या दुरुस्‍तीमुळे सुधारित देयके त्‍वरित उपलब्‍ध होतील. महानगरपालिकेच्‍या देयकांसाठी वापरात असलेल्‍या कागदाचा व त्‍यावरील पोस्टेज, पाकिटे, फ्रॅकिंग या बाबींचा खर्च टाळता येईल. वेळ व पैसा या दोन्हींबाबत करदात्यांसह महानगरपालिकेचीही बचत होणार आहे.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content