Homeचिट चॅटनवनिर्वाचित खासदार वडकुते...

नवनिर्वाचित खासदार वडकुते यांचा के. रवि यांच्या हस्ते सत्कार

राज्यसभेवर नुकतीच निवड झालेल्या रामराव वडकुते यांचा भव्य सत्कार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात नुकताच उत्साहात पार पडला. इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट, मुंबई यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कंपनीचे संचालक के. रवि (दादा) यांच्या पुढाकाराने करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान समाजातील विविध प्रश्न, ग्रामीण भागातील समस्या, वंचित घटकांच्या अडचणी तसेच सर्वसामान्य नागरिकांशी संबंधित विषयांवर जाहीर सविस्तर चर्चा करण्यात आली.

आपल्या मनोगतात के. रवि (दादा) यांनी सांगितले की, समाजाशी नाळ जोडून राहणे ही प्रत्येक व्यक्तीची नैतिक जबाबदारी आहे. समाजात राहून समाजासाठी काम करण्याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. प्रत्येक नागरिकाने आपल्या परीने छोटासा का होईना, पण समाजासाठी खारीचा वाटा उचलणे आवश्यक आहे.

यावेळी सत्कारमूर्ती खासदार रामराव वडकुते यांनी राज्यसभेतून काम करताना ग्रामीण भागातील समस्या, वंचित घटकांचे प्रश्न तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. जनतेने व्यक्त केलेला विश्वास पूर्ण करण्यासाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाची प्रस्तावना प्रीतम आठवले यांनी केली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सुरेश यादव यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे आभार अ‍ॅड. शंकर चव्हाण यांनी मानले. या कार्यक्रमाला चित्रपट अभिनेते अली खान, डॉ. वकील, धनलक्ष्मी कृष्णअय्यर, के टी गोलानी, यशवंत वानखेडे, बाळासाहेब किसवे तसेच चेतमन खडस (नेपाळ असोसिएशन, अध्यक्ष) यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. बाला वाडीयार, कन्नू यादव, नितीन पाटील, रॉकी फ़र्नान्डिस, अरुण वडनेरे आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content