Homeचिट चॅटराष्ट्रीय बीच कबड्डीकरीता...

राष्ट्रीय बीच कबड्डीकरीता महाराष्ट्राचे संघ जाहीर

बिहार येथील बुद्धगया येथे होणाऱ्या ११व्या पुरुष व महिला राष्ट्रीय बीच कबड्डी स्पर्धेकरीता महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने आपले दोन्ही संघ जाहीर केले आहेत. पुणे शहराच्या आम्रपाली गलांडे हिच्याकडे महिला संघाचे तर नाशिक शहरच्या आकाश शिंदे ह्याच्याकडे पुरुष संघाचे नेतृत्त्व सोपविण्यात आले आहे. भारतीय कबड्डी महासंघाच्या मान्यतेने बिहार राज्य कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने ९ ते ११ ऑगस्टदरम्यान या स्पर्धा होतील.

महिला संघ:- १) निकिता पडवळ (पुणे ग्रामीण), १)आम्रपाली गलांडे (पुणे शहर), ३) समरीन बुरोंडकर (रत्नागिरी), ४) हरजित कौर संधू (मुंबई उपनगर पूर्व), ५) जुईली मिस्किटा (पालघर), ६) दिव्या गोगावले (पिंपरी-चिंचवड).

प्रशिक्षक:- संतोष शिर्के.  व्यवस्थापिका:- डॉ. विद्या हनुमंते (पाठारे).

पुरुष संघ:- १)अक्षय सुर्यवंशी (पुणे ग्रामीण), २) शंकर गदई (छ. संभाजी नगर), ३) सुनील दुबिले (पुणे शहर), ४)आकाश रुडले (मुंबई उपनगर पूर्व), ५) आकाश शिंदे (नाशिक शहर), ६) ऋषिकेश भोजने (पुणे ग्रामीण).

प्रशिक्षक:- प्रताप शेट्टी.  व्यवस्थापक:- सागर गोळे.

Continue reading

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...
Skip to content