Homeमुंबई स्पेशलकृपाशंकर सिंह पुन्हा...

कृपाशंकर सिंह पुन्हा मुंबईत सक्रिय!

उत्तर प्रदेशातल्या जौनपूरमधून भारतीय जनता पार्टीकडून खासदारकी मिळविण्यात अपयशी ठरलेले महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह पुन्हा महाराष्ट्रात सक्रिय झाले आहेत. विधानसभेच्या येत्या निवडणुकीतही आपल्या मुंबईतल्या परंपरागत सांताक्रूझ कलिना मतदारसंघातून भाग्य अजमविण्याची शक्यता आहे.

याकरीता कृपाशंकर सिंह यांनी तयारीही चालविली आहे. शनिवारी त्यांच्या तसेच काका बाप्टिस्ट उद्यानातल्या मॉर्निंग वॉकर्स यांच्या हस्ते काका बाप्टिस्ट उद्यान कालिना सांताक्रूझ पूर्व येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस उद्यानामध्ये १०० विविध देशी प्रजातींचे वृक्षारोपण करण्यात आले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कृपाशंकर सिंह यांनी जौनपूरमधून भाजपाकडून निवडणूक लढवली होती.

रवींद्र वायकरांच्याही हस्ते झाले वृक्षारोपण

शनिवारीच लोकसभा निवडणुकीत सर्वात कमी म्हणजेच अवघ्या ४८ मतांनी निवडून आलेले शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांनीही वृक्षारोपण केले. मुंबईतल्या त्यांच्या उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातल्या जोगेश्वरी पूर्व येथील शहीद अशोक कामटे मनोरंजन मैदानात मुंबई महापालिकेच्या के पूर्व विभागाच्या मदतीने ५०० झाडे लावण्यात आली.

Continue reading

सरकारने शेतकऱ्यांची थट्टा थांबवावी!

ऐन दिवाळीच्या तोंडावर दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या हातात भरीव मदत देण्याऐवजी अवघ्या पाच हजार रुपयांची घोषणा करून राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झालेली पिके, कर्जाचा डोंगर आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न या पाच हजार...

रजेवर भिमनवार; एमपीएससीच्या हंगामी अध्यक्षपदी वाघोले स्वार!

राज्याच्या विधि न्याय विभाग आणि संसदीय कार्य विभागाचे निवृत्त सचिव सतीश वाघोले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) हंगामी (प्रभारी) अध्यक्षपदी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी नियुक्ती केली आहे. एम.पी.एस.सी.च्या प्रश्नपत्रिका फुटत असल्याच्या प्रकरणावरून एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्यासाठी...

राष्ट्रीय स्लिंगशॉट स्पर्धेत गौरव मोकाशींना सुवर्णपदक

१४वी राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिप-२०२६ स्पर्धा छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ४० ते ४५ वर्षे वयाच्या गटात दहिसर, मुंबईचे गौरव मोकाशी यांनी सुवर्णपदक पटकावले. या आधीच्या राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिपमध्ये त्यांना रौप्यपदक मिळाले होते....
Skip to content