Homeपब्लिक फिगरकोविडसाठी ५० टक्के...

कोविडसाठी ५० टक्के खाटा आरक्षित करा- डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे शहरातली कोव्हिड-१९च्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येथील खासगी इस्पितळात ५० टक्के बेड आरक्षित करण्याबाबत निर्देश द्यावेत, अशी सूचना राज्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीम गोऱ्हे यांनी पुण्याच्या महापालिका आयुक्तांना दिले आहेत.

कोव्हिड-१९च्या रुग्णांची संख्या कमी होत असताना अचानक यात वाढ झाल्याचे गेल्या काही दिवसांच्या आलेखातून निदर्शनास येत आहे. मार्चनंतर आजतागायत संख्या कमी करण्यासाठी आपल्या नियोजनाला खूप मोठे यश प्राप्त झाले आहे. आज एका रुग्णाच्या नातेवाईकांनी मुलाखत देताना सांगितले की, हॉस्पिटलमध्ये कोव्हिडच्या रुग्णांना घेऊन गेल्यानंतर जनरल बेड उपलब्ध नसतात. आयसीयूमध्ये कोव्हिडव्यतिरिक्त इतर रुग्णांना प्रवेश दिले जातात.   परिणामी रुग्णांची आणि नातेवाईकांची हेळसांड होताना दिसत आहे. लसीकरण सध्या सुरू असले तरी ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागणार आहे, असे त्या म्हणाल्या.

पूर्वीच्या तुलनेत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरीदेखील नियमात शिथिलता आल्याने रुग्णांत सध्या वाढ होताना दिसत आहे. तरी पुढील सहा महिने कोव्हिड रुग्णांसाठी सर्व इस्पितळात जनरल वॉर्डात आणि आयसीयूमध्ये ५० टक्के बेड आरक्षित करण्यात यावे, असे निर्देशही डॉ. गोऱ्हे यांनी दिले.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content