Homeपब्लिक फिगरराज्यात ऑनलाईन रोलैट...

राज्यात ऑनलाईन रोलैट जुगार बोकाळला?

राज्यात सध्या ऑनलाईन रोलैट जुगाराचे प्रकार बोकाळले असून त्याची दखल आता खुद्द विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनीच घेतली आहे. या जुगारचालकांवर अत्यंत कडक कारवाई करावी. यासाठी गरज भासल्यास कायद्यात सुधारणाही करू, असा गर्भित इशाराही त्यांनी दिला आहे.

राज्यातील शहरी व ग्रामीण भागात जुगाऱ्यांनी मोबाईलवरून ऑनलाईन रौलेट बिंगो खेळण्याचे तंत्रज्ञान अवगत केल्याने हा प्रकार रोखण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे़. यामध्ये कोट्यवधी रुपयांच्या उलाढाली होत असून विशेषतः तरुण आणि विद्यार्थ्यांना या जुगाराच्या खेळातून गंडवले गेल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत.

या प्रकारांची तातडीने दखल घेत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी काल मुंबईत विधानभवन येथे गृह विभागाचे प्रधान सचिव संजय सक्सेना, नाशिक शहर पोलीस आयुक्त दीपक पांडे आणि नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील, सायबर क्राईम तसेच सबंधित विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत फास्ट ट्रॅक बैठक बोलावली होती. या बैठकीत झिरवाळ यांनी उपस्थितांना या प्रकारांची गंभीर दखल देत कडक कारवाई करावी, असे निर्देश दिले.

नाशिक शहर पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी येत्या आठवड्यात ऑनलाईन रोलैट जुगाराचा मुख्य सूत्रधार पकडला जाणार असल्याची माहिती दिली आणि येत्या 4 महिन्यात या प्रकरणाचा पूर्णपणे छडा लावण्यात येईल, अशी ग्वाही देत सर्व आरोपींना भारतीय दंडसंहिता कलम 420 आणि मोक्का अंतर्गत शिक्षा करण्यात येणार असल्याचे सांगितले.

नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी ऑनलाईन रोलैट रॅकेटचा नाशिकमधील सुपर डीलर कैलाश शाह याला पुन्हा एकदा पकडण्याची सर्व पुराव्यानिशी तयारी झाली असल्याची माहिती या बैठकीत दिली.

या ऑनलाईन रोलैट जुगारामुळे तरुणांचे आणि विद्यार्थी यांचे मोठे आर्थिक व कौटुंबिक नुकसान होत असून फसवणूक झाल्याने आत्महत्त्यांचे प्रमाण वाढत असल्याची चिंता नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केली. भविष्यात होणारे नुकसान टाळण्यासाठी शासनाचा कडक अंकुश असण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आणि गरज पडल्यास कायद्यात आवश्यक सुधारणा करण्याविषयी विचार करता येईल असेही झिरवाळ यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर भोईर आणि नाशिक जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष नंदन भास्करे यांनी यासंदर्भात पाठपुरावा करून बैठक लावण्याची विनंती केली होती.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content