Homeटॉप स्टोरीइराणने युद्धविराम तोडला!

इराणने युद्धविराम तोडला!

गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला युद्धविराम आज अखेर इराणने तोडला. इराणने आज होर्मूझच्या सामुद्रधुनीत नाकेबंदीला असलेल्या अमेरिकेच्या युद्धनौकेवरच हल्ला केल्याचे वृत्त आहे. अमेरिकेची ही युद्धनौका इराणच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला असता इराणने या युद्धनौकेला दोनदा परतण्याचा इशारा दिला. परंतु युद्धनौकेने या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर इराणने या युद्धनौकेवर मिसाईलने हल्ला केला. त्यानंतर ही युद्धनौका माघारी फिरल्याचे कळते. याशिवाय आज दिवसभरात इराणने संयुक्त अरब अमिरातीत चारवेळा हल्ले केले. मिसाईलने केलेले हे हल्ले परतवले असल्याचे अमिरातीने म्हटले आहे.

होर्मूझ सामुद्रधुनीवर इराणचे नियंत्रण आहे. हा हल्ला करून इराणने अमेरिकेला हेच पुन्हा दाखवून दिले आहे. या परिसरात नाकेबंदी करून इराणला जेरीस आणण्याच्या प्रयत्नात अमेरिका ही नाकेबंदी अधिक कडक करण्याच्या प्रयत्नात आहे. नाकेबंदी हटवल्याशिवाय अमेरिकेबरोबर युद्धविरामाच्या दृष्टीने चर्चा करणार नाही, अशी भूमिका इराणने घेतली आहे. अमेरिकेकडून आपल्यावर हल्ला झाल्यास आखाती देशांना उद्ध्वस्त केले जाईल, असा इशाराही इराणने दिला आहे. या घटनेनंतर अमेरिका व इस्त्रायलकडून जोरदार हल्ले केले जाण्याची शक्यता ओळखून इराणने देशभर अलर्ट जारी केला आहे. संयुक्त अरब अमिरातीतल्या फुजैराह फोर्टमधल्या रिफायनरीवरही इराणने ड्रोनहल्ला केला. त्यामुळे रिफायनरीला आग लागली. यात तीन भारतीय जखमी झाल्याचेही कळते.

Continue reading

राज्य नाट्य स्पर्धेसाठी पत्रकार संघाकडून ‘ही परी अस्मानीची’!

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे यंदाच्या ६५व्या राज्य नाट्य स्पर्धेसाठी ‘ही परी अस्मानीची’ या नाटकाची निवड करण्यात आली आहे. या नाटकाच्या नाट्यसंहितेचे पूजन लोकनेते, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पत्रकार संघाच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे...

आंतरशालेय तायक्वांडो स्पर्धेत खेलो तायक्वांडो अकादमीचे घवघवीत यश

मुंबईत नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय तायक्वांडो स्पर्धेत खेलो तायक्वांडो अकादमीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत विविध वजनी गटांत १४ सुवर्ण, ९ रौप्य आणि १२ कांस्य पदकांची, अशी एकूण ३५ पदकांची घसघशीत कमाई केली. १४ आणि १७ वर्षांखालील या दोन...

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...
Skip to content