Saturday, February 8, 2025
Homeहेल्थ इज वेल्थफ्रान्समधल्या वैद्यकीय व...

फ्रान्समधल्या वैद्यकीय व आरोग्य क्रीडा स्पर्धेत भारत चमकला

फ्रान्समध्ये सेंट-ट्रोपेझ येथे नुकत्याच (16 ते 23 जून 2024) झालेल्या 43व्या जागतिक वैद्यकीय आणि आरोग्य क्रीडा स्पर्धांमध्ये सशस्त्र दल वैद्यकीय सेवेतल्या (AFMS) चार अधिकाऱ्यांनी 32 पदके जिंकून भारतासाठी विक्रमी कामगिरी बजावली. आरोग्य व्यावसायिकांसाठी भरवल्या जाणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धेत लेफ्टनंट कर्नल संजीव मलिक, मेजर अनिश जॉर्ज, कॅप्टन स्टीफन सेबॅस्टियन आणि कॅप्टन डॅनिया जेम्स या अधिकाऱ्यांनी 19 सुवर्ण पदके, 9 रौप्य पदके आणि 4 कांस्य पदके जिंकून इतिहास रचला.

या अधिकाऱ्यांची विजयी कामगिरी पुढीलप्रमाणे:

लेफ्टनंट कर्नल संजीव मलिक व्हीएसएमः पाच सुवर्ण पदके

मेजर अनिश जॉर्जः चार सुवर्ण, सहा रौप्य आणि दोन कांस्य पदके

कॅप्टन स्टीफन सेबॅस्टियनः सहा सुवर्णपदके

कॅप्टन डॅनिया जेम्सः चार सुवर्ण, तीन रौप्य, दोन कांस्य पदके

सशस्त्र दल वैद्यकीय सेवेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल दलजीत सिंग यांनी या अधिकाऱ्यांचे नेत्रदीपक कामगिरीबद्दल अभिनंदन केले असून आणि भविष्यात त्यांच्याकडून आणखी गौरवास्पद कामगिरी घडावी यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

आरोग्य व्यावसायिकांसाठी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा म्हणून कायम ओळखल्या जाणाऱ्या जागतिक वैद्यकीय आणि आरोग्य क्रीडा स्पर्धा वैद्यकीय समुदायातील सर्वात प्रतिष्ठित जागतिक क्रीडा स्पर्धा म्हणून विकसित झाल्या आहेत. सन 1978पासूनचा वारसा असलेल्या या क्रीडा स्पर्धांमध्ये दरवर्षी 50पेक्षा जास्त निरनिराळ्या राष्ट्रांमधून 2500हून अधिक खेळाडू सहभागी होतात.

भारतीय सशस्त्र दलाच्या वैद्यकीय सेवा अधिकाऱ्यांची कामगिरी केवळ त्यांची श्रेष्ठता अधोरेखित करत नाही तर जागतिक स्तरावर आरोग्यसेवा व्यावसायिकांचे त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील कौशल्यासोबतच क्रीडा क्षेत्रातील कामगिरीद्वारे त्यांचे समर्पणदेखील दर्शविते. यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातील हजारो डॉक्टर आणि परिचारिकांना तंदुरुस्तीचे राजदूत बनण्यासाठीही प्रेरणा मिळेल.

Continue reading

‘छबी’तून उलगडणार अनोखी छबी!

प्रत्येक फोटोमागे एक गोष्ट असते तशी प्रत्येक फोटोग्राफरचीही एक गोष्ट असते. अशाच फोटोग्राफरची रंजक गोष्ट "छबी" या चित्रपटातून उलगडणार आहे. अद्वैत मसूरकर दिग्दर्शित, तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट २५ एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल...

वस‌ईच्या सूर्योदय आरबीएल स्कूलला विजेतेपद

मुंबईतल्या ए डब्ल्यू एम एच महाराष्ट्र या संस्थेने आयोजित केलेल्या स्पेशल चाईल्ड स्कूलच्या मुलांच्या क्रिकेटच्या अंतिम सामन्यात‌ वसई येथील सूर्योदय आरबीएल स्कूल मतिमंद मुलांच्या शाळेच्या संघाने विजेतेपद मिळविले. गोरेगाव येथे झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात‌ सूर्योदय आरबीएल स्कूलने मुंबई उपनगर...

वरळीत कोटक कुटुंबाने 202 कोटींत खरेदी केले 12 फ्लॅट्स!

कोटक महिंद्रा बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ उदय कोटक यांनी मुंबईच्या रिअल इस्टेट क्षेत्रात अलीकडील सर्वात मोठी व्यक्तिगत खरेदी केली आहे. त्यांनी वरळीत तब्बल 200 कोटींहून अधिक रक्कम मोजून फ्लॅट्स खरेदी केले आहेत. शिव सागर नावाच्या तीन मजली...
Skip to content