Homeडेली पल्समहाराष्ट्रात पुढचे तीन...

महाराष्ट्रात पुढचे तीन दिवस मुसळधार!

भारतीय हवामान खात्याने राज्यात पुढील तीन दिवसांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे, कोकण, आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, काही ठिकाणी पाणी साचण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत समुद्र किनाऱ्यांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

राज्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर विदर्भ आणि मराठवाड्यात यलो अलर्ट लागू आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट भागातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ ते ४८ तासांत पावसाचा जोर कायम राहणार आहे.

रेड अलर्ट: ४ ऑगस्ट – सातारा, पुणे आणि पालघर

ऑरेंज अलर्ट: ४ ऑगस्ट – सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, नाशिक, ५ ऑगस्ट – सातारा

यलो अलर्ट: संपूर्ण विदर्भ (३ ते ७ ऑगस्ट), कोल्हापूर (४ ऑगस्ट) सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, नाशिक, पुणे आणि कोल्हापूर (५ ऑगस्ट), रत्नागिरी, रायगड, पुणे आणि सातारा (६ ऑगस्ट)

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content