Homeबॅक पेजगजानन कीर्तिकर यांच्या...

गजानन कीर्तिकर यांच्या पत्नी मेघना यांचे निधन

शिवसेनेचे नेते, माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्‍या पत्‍नी मेघना कीर्तिकर यांचे आज, रविवारी पहाटे साडेतीन वाजता वयाच्‍या ८२व्‍या वर्षी अल्‍पश: आजाराने निधन झाले. अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव त्यांचे निवासस्थान- स्नेहदीप, पहाडी रोड नं. २, आरे मार्ग, गोरेगाव (पूर्व), मुंबई- ६३ येथे सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत ठेवण्यात येईल. त्यानंतर पार्थिवावर शिवधाम स्‍मशानभूमी, पश्चिम द्रूतगती महामार्ग, गोरेगाव (पूर्व) येथे अंत्‍यसंस्‍कार केले जातील.

गेल्या काही दिवसांपासून मेघना कीर्तिकर कर्करोगाने आजारी होत्या. गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतल्या लीलावती रूग्णालयात उपचार सुरू होते. काल त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यामागे पती गजानन कीर्तिकर, मुलगा अमोल कीर्तिकर, मुली गौरी आणि हर्षदा असा परिवार आहे.

Continue reading

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...
Skip to content