Homeचिट चॅटडॉ. उज्ज्वला जाधव...

डॉ. उज्ज्वला जाधव दिल्लीच्या राजकारणात!

मुंबईत आपले कर्तृत्त्व गाजविणाऱ्या मराठवाड्यातील औरंगाबादच्या रणरागिणी डॉ. प्रा. उज्ज्वला जाधव यांची भारतीय जनता पक्ष अनुसूचित मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर विशेष निमंत्रित म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

उच्च विद्याविभूषित अशा डॉ. प्रा. उज्ज्वला जाधव यांनी भारिप बहुजन महासंघाच्या प्रदेश प्रवक्त्या म्हणून यापूर्वी कार्य केले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली पक्षबांधणी करता करता डॉ. प्रा. जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वावर विश्वास व्यक्त करुन भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. परंतु गेल्या काही वर्षांपासून त्यांच्याकडे पक्षाने कोणतीही विशेष जबाबदारी सोपविली नव्हती.

पण, धीरज का फल मीठा होता है, या न्यायाने त्यांनी आपले कार्य चालूच ठेवले. परिणामी, भाजपने आता डॉ. प्रा. उज्ज्वला जाधव यांच्या कार्यकर्तृत्त्वाला साजेशी राष्ट्रीय पातळीवर अनुसूचित मोर्चाच्या कार्यकारिणीवर विशेष निमंत्रित म्हणून नेमणूक केल्यामुळे महाराष्ट्रातील भाजपच्या महिलांना विशेषतः मागासवर्गीय बांधव आणि भगिनींना उज्ज्वल भवितव्य प्राप्त करुन देण्यासाठी डॉ. प्रा. उज्ज्वला जाधव प्रयत्नशील राहतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content