मधुमेहींसाठी अत्यंत योग्य आहार कसा असावा, याचे विवेचन सुप्रसिद्ध क्रिटीकल केअर एक्स्पर्ट डॉ. विजय डिसिल्वा यांनी नुकतेच केले आहे. स्वतःचा संतुलित आहार कसा ठेवावा, स्वतःच त्याची निवड कशी करावी, त्या आहाराद्वारे आपल्या शरीराला पोषक असणारी द्रव्ये किती प्रमाणात मिळतात, याचे विवेचन करणारा हा दुसरा भाग…
कॅलरीजची माहिती (ही सर्वसमावेशक यादी नाही)-
न्याहारीचे पदार्थ-
• आलू पराठा- ३०० कॅलरी
• छोले भटुरे (१ सर्व्हिंग)- ४५०-५०० कॅलरी
• डोसा (१ मध्यम)- १६८ कॅलरी
• इडली (१ नग)- ४० कॅलरी
• मिसळ-पाव (१ प्लेट)- ४०० कॅलरी
• पराठा (१ नग, साधा)- २६० कॅलरी
• समोसा (१ नग)- २०० कॅलरी
• उपमा (१ कप)- २२० कॅलरी
दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणातील पदार्थ-
• बिर्याणी (१ प्लेट, चिकन/व्हेज)- ५००-७०० कॅलरी
• डाळ (१ कप शिजवलेली)- १५० कॅलरी
• खिचडी (१ कप, मूग डाळ + तांदूळ)- २५० कॅलरी
• मटण करी (१ वाटी)- २४० कॅलरी
• पुरी (१ नग)- २४० कॅलरी
• राजमा (१ कप)- २५० कॅलरी
• रोटी (१ नग, गव्हाची)- १२० कॅलरी
• भात (१ कप शिजवलेला)- २०० कॅलरी
• भाजी (१ कप, कमी तेलात शिजवलेली)- १२०-१८० कॅलरी
• सांबार (१ कप)- १५० कॅलरी

नाश्ता आणि स्ट्रीट फूड-
• भजी (१०० ग्रॅम, मिश्र भाज्यांची)- ३०० कॅलरी
• पाणीपुरी (६ नग, सारण आणि पाण्यासह)- १८०-२२० कॅलरी
• समोसा (१ नग, मध्यम आकाराचा)- १५०-२०० कॅलरी
• वडापाव (१ नग)- २८० कॅलरी
मिठाई आणि डेझर्ट्स-
• गुलाबजाम (१ नग)- १५० कॅलरी
• हलवा (१ सर्व्हिंग, गाजर/रवा)- ३००-४०० कॅलरी
• जिलेबी (१ नग, मध्यम आकाराची)- १५०-२०० कॅलरी
• खीर (१ कप)- ३०० कॅलरी
• लाडू (१ नग, बेसन/मोतीचूर)- १८०-२५० कॅलरी
• रसगुल्ला (१ नग, मध्यम आकाराचा)- १२० कॅलरी
पेये-
• ताक (१ कप, साखर न घातलेले)- ५० कॅलरी
• चहा (दूध आणि साखरेसह, १ कप)- १०० कॅलरी
• नारळ पाणी (१ कप)- ४५ कॅलरी
• लस्सी (गोड, १ कप)- २२० कॅलरी
• उसाचा रस (१ ग्लास, २५० मिली)- अंदाजे १८० कॅलरी

फळे (प्रति १०० ग्रॅम कॅलरी)-
◦ कलिंगड- २६
◦ पपई- ३२
◦ काळी द्राक्षे- ४५
◦ किवी- ४५
◦ अननस- ४६
◦ पीच- ५०
◦ पेअर (नाश्पती)- ५१
◦ संत्रे- ५३
◦ आलू बुखारा (Plums)- ५६
◦ सफरचंद- ५६
◦ लिची- ६१
◦ पेरू- ६६
◦ चेरी- ७०
◦ आंबा- ७०
◦ स्ट्रॉबेरी- ७७
◦ डाळिंब- ७७
◦ चिकू- ९४
◦ केळी- ९५
◦ खजूर- २८१
प्रति १०० ग्रॅम कॅलरी-
◦ लोणी- ७५० कॅलरी
◦ चीज- ३१५ कॅलरी
◦ क्रीम- २१० कॅलरी
◦ तूप- ९१० कॅलरी
◦ आईस्क्रीम- १७० कॅलरी
◦ मार्जरीन- ७४० कॅलरी
◦ डुकराचे मांस (Pork)- ३४० कॅलरी
◦ चिकन- १५० कॅलरी
◦ शेंगदाणे- ५७० कॅलरी
◦ ब्रेड- २३० कॅलरी
◦ दुधासह कॉर्नफ्लेक्स- २०० कॅलरी
◦ चॉकलेट बिस्किट- ५२० कॅलरी
प्रति कप कॅलरीज-
◦ म्हशीचे दूध- ११५ कॅलरी
◦ गायीचे दूध- १०० कॅलरी
◦ स्किम्ड दूध (चरबी काढलेले)- ४५ कॅलरी
◦ ताक- २० कॅलरी
इतर पदार्थांमधील कॅलरी-
◦ साखर १ मोठा चमचा- ४५ कॅलरी
◦ मध १ मोठा चमचा- ९० कॅलरी
(लेखक डॉ. विजय डिसिल्वा सुप्रसिद्ध ज्येष्ठ क्रिटीकल केअर एक्स्पर्ट आहेत. मुंबईतल्या अनेक मोठमोठ्या, नामांकित रुग्णालयांमधून गेल्या ३० वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत असलेले डॉ. डिसिल्वा सध्या नवी मुंबईतल्या व्हाईट लोटस इंटरनॅशनल हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक तथा संचालक, क्रिटीकल केअर आणि कंसल्टंट फिजीशिअन म्हणून कार्यरत आहेत. वेबसाईट- https://drvijaydsilva.com/ संपर्कः व्हाईट लोटस हॉस्पिटल- 91-8879307930, 022-50535001/2/3/4.)

