Homeपब्लिक फिगरमुख्यमंत्री ठाकरेंनी संपत्ती...

मुख्यमंत्री ठाकरेंनी संपत्ती दडपली?

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्ती दडपली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीची प्रत्यक्ष कागदपत्रांसमोर/करारपत्रांबरोबर पडताळणी केली असता हे साफ दिसून येत आहे, अशी तक्रार  भारतीय जनता पार्टीचे नेते डॉ. किरीट सोमैया यांनी आयकर विभागाकडे केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी दडपलेल्या संपत्तीसंदर्भात निवडणूक आयोग, दिल्ली येथे तक्रार दाखल केल्यानंतर आज 8 फेब्रुवारी रोजी आयकर विभागाच्या इन्वेस्टिगेशन विंगच्या महासंचालक भानुमती यांच्याकडे तक्रार दाखल करून सदर प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती त्यांनी केली.

उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्तीचे खरेदीमूल्य रू. 4,37,00,000 दाखवले आहे. पण करारामध्ये बाजारमूल्य रु. 4,14,00,000 असल्याचे दिसून येते. परंतू, खरेदी मूल्य रु.2,10,00,000 असल्याचे दिसून येते. रश्मी उद्धव ठाकरे यांनी 19 घरांचा (एकूण 23,500 स्क्वे. फूट बांधकाम), 8 वर्षांचा (1/4/2013 ते 31/3/2021पर्यंत) प्रॉपर्टी टॅक्स/कर 12 नोव्हेंबर 2020 रोजी भरला. ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डनुसार एकूण संपत्तीचे बाजारमूल्य रु. 5,29,00,000 आहे. अशाप्रकारे उद्धव ठाकरे यांच्याकडे कोर्लाई, अलिबाग येथे रु. 10.50 कोटी रुपयांची जमीन व मालमत्ता आहे. पण सांपत्ती/मालमत्तेची किंमत व मूल्य रु. 2.10 कोटी एवढीच दाखवली आहे, असे सोमैया यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

Continue reading

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...
Skip to content