स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः भारावून गेले. मुंबईसह पुणे, रायगड, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. भारतमातेला सलाम करत कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि भारतमातेविषयीची आस्था जागवण्याचा संदेश देण्यात आला.
भारतमाता आणि गोमातेला साकडे घालणारे हे देशभक्तीपर गीत...
मुंबईच्या भायखळा पोलीसठाण्याच्या हद्दीत असलेल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजेच राणीच्या बागेतून पळवण्यात आलेला आरव, हा साडेसात वर्षांचा मुलगा काही तासांतच सीएसएमटी म्हणजेच छत्रपती...
मुंबईच्या भायखळ्यातले वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय (राणीची बाग) येत्या सोमवारपासून म्हणजेच १ नोव्हेंबर २०२१ पासून पूर्वीप्रमाणेच म्हणजे नियमित वेळेनुसार नागरिकांकरिता खुले राहणार...
मुंबई उच्च न्यायालयाने आज संध्याकाळी प्रसिद्ध अभिनेते शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खान याला जामीन मंजूर केला. क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणात गेल्या २५ दिवसांपासून आर्यन...
समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी केलेले आरोप अत्यंत चुकीचे, खोडसाळ आणि पूर्वग्रहदूषित आहेत. ते आमचे मित्र आहेत. पण तरीही त्यांनी समीर वानखेडे यांच्याबाबतीत...
मुंबई महापालिकेतर्फे मुंबई शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या भांडुप संकुल येथील १९१० दशलक्ष उदंचन केंद्रात दोन १२०० मिलीमीटर व्यासाच्या स्लुईस झडपा बदलण्याचे काम तसेच पिसे-पांजरापूर संकुलातील...
मुंबई महापालिकेच्या वतीने प्रगतीपथावर असलेल्या गोरेगांव–मुलुंड जोडरस्ता (लिंक रोड) बांधकामामध्ये अडथळा ठरत असलेली ३५ अतिक्रमणे पी/दक्षिण विभाग कार्यालयाने आज काढून टाकली.
ही अतिक्रमणे हटविल्याने या...
मुंबई टपाल विभागाकडून आज “तुमच्या पोस्टमनविषयी जाणून घ्या” (Know your Postman) या मोबाईल अॅपचा आरंभ करण्यात आला. पोस्टमास्तर जनरल स्वाती पांडे यांची याप्रसंगी विशेष...
पूर्व उपनगरातील सर्वात मोठे उद्यान अशी ख्याती असलेल्या भक्ती पार्कमध्ये १२ राशी आणि २७ नक्षत्रांचे शास्त्रीय महत्त्व सांगणारे उद्यानही विकसित झाले आहे. भक्ती पार्कमधील या...
सोमवारी सत्ताधाऱ्यांच्या 'महाराष्ट्र बंद'ने त्रासल्यानंतर मुंबईकरांना छत्रपती शिवाजी टर्मिनसवर सुखद आनंद घेण्याची संधी मिळाली. तेथील महापालिकेच्या मुख्यालयाची इमारत गुलाबी झाली होती. या गुलाबी प्रकाशात...