Homeमुंबई स्पेशलबुधवारी मिळणार बाळासाहेबांच्या...

बुधवारी मिळणार बाळासाहेबांच्या स्मृतींना उजाळा!

१७ नोव्हेंबर हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन. हजारो शिवसैनिक यानिमित्त मुंबईतल्या शिवतीर्थावरील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर येऊन त्यांना अभिवादन करतात. येत्या बुधवारी म्हणजेच १७ नोव्हेंबरला बाळासाहेबांचा नववा स्मृतीदिन आहे. हजारो शिवसैनिक, बाळासाहेबांचे अनुयायी यानिमित्ताने स्मृतीस्थळावर येणार

बाळासाहेबांच्या

आहेत. शिवसैनिकांची तसेच बाळासाहेबांच्या चाहत्यांची गर्दी लक्षात घेऊन मुंबई महापालिकेतर्फे स्मृतीस्थळावर चोख व्यवस्था दरवर्षी केली जाते. यंदाही तशी तयारी सध्या सुरू आहे. स्मृतीस्थळ तसेच आसपासचा परिसर सुशोभित करण्याचे कामही चालू आहे. त्याचे हे बोलके क्षण..

बाळासाहेबांच्या

मुंबई महापालिकेच्या मेंटेनन्स, इलेक्ट्रिक, इंजिनिअरिंग तसेच गार्डन डिपार्टमेंटचे साधारण ३५ ते ४० कर्मचारी सध्या ही सर्व तयारी करत आहेत. स्मृतीस्थळावर मंडप उभारला जात आहे. रंगरंगोटी केली जात आहे. ग्रील्स दुरूस्त होत आहेत. सर्वात महत्त्वाचा भाग आहे, फुलझाडांच्या रचनेचा. फुलझाडे तसेच रंगीत पानांची झाडे विविध आकारात रचून परिसर सुशोभित करण्यात येत आहे.

बाळासाहेबांच्या

यात लाल-पिवळ्या रंगांची फुले असलेल्या पॉईंटेशिया, फिकट पिवळ्या रंगांच्या शेवंती, रंगीबेरंगी जेरबेरा, केशरी रंगाचा गोंडा आदी झाडांचा वापर केला जात आहे. लॉनवर सर्वत्र हिरव्या रंगाची चादर पसरलेली दिसेल याची खबरदारी घेताना हवे त्या प्रमाणात गवत लावले जात आहे.

बाळासाहेबांच्या

आठ नोव्हेंबरपासून सुरू असलेली ही तयारी आता अंतीम टप्प्यात आली आहे. उद्या रात्रीपर्यंत सारे काम पूर्ण होईल असा अंदाज असून मंगळवारी वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी जाऊन साऱ्या व्यवस्थेचा आढावा घेणार असल्याचे समजते.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content