डेली पल्स

बँक खात्यात रुपयाही नसला तरी काढता येणार दहा हजार!

पंतप्रधान जनधन योजनेच्या (पीएमजेडीवाय) खातेदारांसाठी केंद्र सरकारची एक महत्त्वाची सुविधा पुन्हा चर्चेत आली आहे. खात्यात शिल्लक शून्य असली (म्हणजेच खात्यात पैसे नसले) तरी पात्र खातेदाराला १०,००० रुपयांपर्यंतची रक्कम काढता येते. ही सुविधा म्हणजे ओव्हरड्राफ्ट. ओव्हरड्राफ्ट म्हणजे बँकेने ठरवून दिलेल्या मर्यादेपर्यंत खात्यात जमा रकमेपेक्षा जास्त पैसे वापरण्याची परवानगी. ही सुविधा आपोआप सर्वांना मिळत नाही. यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतात. जनधन योजना २८ ऑगस्ट २०१४ रोजी सुरू झाली होती. तेव्हा ओव्हरड्राफ्ट मर्यादा ५,००० रुपये होती, जी नंतर वाढवून १०,००० रुपये करण्यात आली. १९ ऑगस्ट २०२६पर्यंत देशात ५९.०९ कोटी जनधन खाती उघडली...

३८ लाख ग्राहकांसाठी...

बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या राज्यातील ३८ लाख घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी महावितरण अभय योजना २०२४ अंमलात येणार असून याद्वारे ग्राहकांना वीजबिलाच्या...

आज जन्माष्टमी!

आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे. यानिमित्त जाणून घेऊया याची पौराणिक माहिती.. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने। प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः।। अर्थ: सर्व दुःखांचे हरण करणार्‍या, भक्तांच्या पीडा, क्लेष दूर...

महाराष्ट्रात मुख्यमंत्री व...

राज्याला एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री असूनही ते महिलांना न्याय देऊ शकत नाहीत. राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. यातून लहान मुलीही...

सोयाबीन, कापसाच्या मदतीसाठी...

महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी अभियान सुरु करण्यासोबतच सोयाबीन व कापसाला हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्यासाठी असलेली ई पिक पाहणीची अट रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ...

बांबू लागवडीसाठी वापरणार...

बांबू लागवडीसाठी खड्डे खोदणे व बांबू कापणे या कामांसाठी मानवविरहित यंत्राचा वापर करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे, असे महाराष्ट्राचे कृषीमूल्य आयोगाचे...

‘संगीत वस्त्रहरण’वर कायमस्वरूपी...

'संगीत वस्त्रहरण’, या मराठी नाटकामध्ये भारतीय संस्कृतीचे आदर्श असलेल्या भीष्म, विदूर, द्रौपदी आदी आदर्श व्यक्तिमत्त्वांचे टोकाचे विडंबन करण्यात आले आहे. कलेच्या नावाखाली विकृतीपणा कलेसाठी तर घातक आहेच; त्याहीपेक्षा...

विधानसभा निवडणुकीसाठी ‘वंचित’ला...

केंद्रीय निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला वंचित न ठेवता संपूर्ण निवडणुकीसाठी गॅस सिलेंडर, हे चिन्ह दिले आहे. लोकसभा निवडणुकीत...

स्वातंत्र्यदिनानिमित्त पेटीएमचे ट्रॅव्हल...

भारतातील आघाडीची पेमेंट्स व आर्थिक सेवा वितरण कंपनी आणि क्यूआर आणि मोबाइल पेमेंट्सची अग्रणी पेटीएमने स्वातंत्र्यदिनानिमित्त २० ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या 'पेटीएम ट्रॅव्हल कार्निव्हल'ची घोषणा केली...

नागपुरात मेफेड्रोन कारखान्याचा...

महसूल गुप्तचर संचालनालयाने शनिवारी नागपुरातील मेफेड्रोन कारखान्याचा पर्दाफाश केला. यामध्ये सुमारे 78  कोटी रुपये किमतीचे 51.95 किलो मेफेड्रोन द्रव स्वरूपात जप्त करण्यात आले. नागपूर शहरातील पाचपावली परिसरात एका बांधकामाधीन इमारतीत गुप्तरित्या मेफेड्रोनचे उत्पादन सुरूअसल्याची गोपनीय माहिती महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई क्षेत्रीय युनिटला मिळाली होती. या  माहितीच्या आधारे शनिवारी एक सुसंघटित शोधमोहीम राबविण्यात आली. मेफेड्रोनच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेली सर्व रसायने, साहित्य आणि यंत्रसामग्रीने सुसज्ज एक छोटी प्रयोगशाळा या इमारतीत उभारण्यात आल्याचे तपासात आढळून आले. या कटाच्या म्होरक्याने प्रथम यंत्रसामग्रीचा संपूर्ण संच खरेदी केला आणि प्रयोगशाळा उभारली. तसेच  100 किलोपेक्षा जास्त मेफेड्रोन तयार करण्याची क्षमता असलेला कच्चा मालदेखील जमा केला. या टोळीने आधीच द्रव स्वरूपातील 50 किलोपेक्षा जास्त मेफेड्रोन तयार केले होते आणि क्रिस्टलाइज्ड  अथवा पावडर स्वरूपातील उत्पादन तयार करण्यासाठी त्यावर पुढील प्रक्रिया सुरू होती. सुमारे 78  कोटी रुपये किमतीचे 51.95 किलो मेफेड्रोन द्रव स्वरूपात जप्त करण्यात आले असून यासोबत कच्चा माल आणि उपकरणेदेखील जप्त करण्यात आली आहेत. अंमली पदार्थ आणि सायकोट्रोपिक म्हणजेच मनावर नकारात्मक परिणाम करणारे पदार्थ (NDPS)  कायदा, 1985 अंतर्गत मेफेड्रोन हा मनावर नकारात्मक परिणाम करणारा पदार्थ आहे. या टोळीचा म्होरक्या किंवा भांडवलदार आणि मेफेड्रोन उत्पादनात गुंतलेल्या त्याच्या तीन साथीदारांना अंमली पदार्थ आणि सायकोट्रोपिक म्हणजेच मनावर नकारात्मक परिणाम करणारे पदार्थ (NDPS) कायदा, 1985 च्या तरतुदींनुसार अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुढील  चौकशीसाठी महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कोठडीत पाठवण्यात आले आहे. या मोहिमेत महसूल...
Skip to content