Homeडेली पल्सविधानसभा निवडणुकीसाठी 'वंचित'ला...

विधानसभा निवडणुकीसाठी ‘वंचित’ला गॅस सिलेंडर!

केंद्रीय निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला वंचित न ठेवता संपूर्ण निवडणुकीसाठी गॅस सिलेंडर, हे चिन्ह दिले आहे.

लोकसभा निवडणुकीत मात्र निवडणूक आयोगाने एकाच निवडणुकीत तीन वेगवेगळी चिन्हे वंचित बहुजन आघाडीला दिली होती. १९ एप्रिलला झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी वंचितला लोकसभेच्या पाचपैकी चार मतदारसंघांत तीन वेगवेगळी निवडणूक चिन्हे मिळाली होती. रामटेक आणि गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात गॅस सिलिंडर, भंडारा लोकसभा मतदारसंघात उसाची मोळी घेतलेला शेतकरी तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात रोड रोलर या निवडणूक चिन्हावर वंचितचे उमेदवार लढले होते.

वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी नवी दिल्लीत निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन लोकसभा निवडणुकीसाठी गॅस सिलिंडर, शिट्टी किंवा रोड रोलर यापैकी एक निवडणूक चिन्ह मिळावे, अशी मागणी केली होती. मात्र, निवडणूक आयोगाने ‘वंचित’ला एकच निवडणूक चिन्ह दिले नव्हते. मात्र, विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाने वंचितला गॅस सिलेंडर, हे चिन्ह दिले आहे.

Continue reading

राज्य नाट्य स्पर्धेसाठी पत्रकार संघाकडून ‘ही परी अस्मानीची’!

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे यंदाच्या ६५व्या राज्य नाट्य स्पर्धेसाठी ‘ही परी अस्मानीची’ या नाटकाची निवड करण्यात आली आहे. या नाटकाच्या नाट्यसंहितेचे पूजन लोकनेते, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पत्रकार संघाच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे...

आंतरशालेय तायक्वांडो स्पर्धेत खेलो तायक्वांडो अकादमीचे घवघवीत यश

मुंबईत नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय तायक्वांडो स्पर्धेत खेलो तायक्वांडो अकादमीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत विविध वजनी गटांत १४ सुवर्ण, ९ रौप्य आणि १२ कांस्य पदकांची, अशी एकूण ३५ पदकांची घसघशीत कमाई केली. १४ आणि १७ वर्षांखालील या दोन...

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...
Skip to content