मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल.
याप्रसंगी त्यांना यति भागवत तबला, तर प्रसाद कामथ संवादिनीवर साथ देतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- (०२२) २४३०४१५०.
भरारी प्रकाशनच्या चार पुस्तकांचा प्रकाशन सोहळा मुंबईच्या विलेपार्ले पूर्व येथील उत्कर्ष मंडळ येथे नुकताच झाला. मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख, आमदार पराग आळवणी, कवी प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते यावेळी स्मिता...
'अवधूत चिंतन क्रिएशन्स प्रा. ली.' या कंपनीने नुकतेच 'अनघाष्टमी'च्या मुहूर्तावर "अवधूत चिंतन" या मोबाईल ॲपचे म्हणजेच ओटीटी प्लॅटफॉर्मचे लोकार्पण केले आहे. दत्तात्रय महाराजांच्या ध्येयवेड्या भक्तरुपी...
मुंबईतल्या विद्यार्थिनी आणि महिलांनी स्वतः पुढाकार घेऊन स्वातंत्र्यलढ्याला बळ देणारे अनेक उपक्रम राबवले. इंदिरा गांधी यांची वानर सेना स्थापन होण्याच्याही आधी, उषाबेन मेहता यांनी...
भारताचा मानबिंदू असलेल्या काही मान्यवरांच्या कार्यकर्तृत्त्वाला सलामी देणारा विशेष ऑनलाईन तीन दिवसीय चित्रपट महोत्सव ‘भारताची रत्ने’ कालपासून सुरू झाला. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या...
केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोक संपर्क कार्यालय, पुणे व पत्र सूचना कार्यालय, मुंबई यांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आतापर्यंत अज्ञात राहिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांविषयी माहितीवर आधारित छायाचित्रांचे...
बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांच्या समर्थ लेखणीतून “राजा शिवछत्रपती” यांचा इतिहास विविध प्रेरणादायी ग्रंथांतून त्यांच्या ओघवत्या शैलीद्वारे मांडला आहे. शिवरायांवरील हे अलौकिक साहित्य प्रत्येक मराठी...
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नावे २३ ऑगस्ट २०१५ यादिवशी एक अनामिक शिखर सर केल्यानंतर त्यानिमित्ताने गेल्या वर्षापासून मुंबईतल्या स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाने सुरू...
भारतातील आणखी चार पाणथळ ठिकाणांना, रामसर ठिकाणे म्हणून रामसर कार्यालयाने मान्यता दिली आहे. गुजरातमधील थोल आणि वाधवाना तर हरियाणातील सुल्तानपूर आणि भिंडवास इथली ही स्थळे आहेत....
मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी "स्वरसंचित" या शीर्षकाअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या जुन्या ध्वनिमुद्रित मैफिलीच्या उपक्रमाअंतर्गत रविवार दिनांक १५ ऑागस्ट रोजी...