Homeकल्चर +'भारताची रत्ने' पाहा...

‘भारताची रत्ने’ पाहा ऑनलाईन चित्रपट महोत्सवातून!

भारताचा मानबिंदू असलेल्या काही मान्यवरांच्या कार्यकर्तृत्त्वाला सलामी देणारा विशेष ऑनलाईन तीन दिवसीय चित्रपट महोत्सव ‘भारताची रत्ने’ कालपासून सुरू झाला. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या फिल्म्स डिव्हिजनच्या वतीने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

याअंतर्गत, देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान, भारतरत्न प्रदान करण्यात आलेल्या विज्ञान, कला आणि संस्कृती क्षेत्रातील काही प्रतिष्ठित व्यक्तिमत्वांचे चरित्रपट दाखवून त्यांचे स्मरण केले जाते. यात प्रा. सी. व्ही. रमण, डॉ. एम. विश्वेश्वरय्या, डॉ. ए पी जे अब्दुल कलाम, प्रा. सी. एन. आर. राव, सत्यजित रे, एम. एस. सुब्बुलक्ष्मी, पं. रवीशंकर, उस्ताद बिस्मिल्ला खान आणि पं. भीमसेन जोशी यांच्यावरील चरित्रपट दाखवले जात आहेत.

‘रत्नाज ऑफ इंडिया’ हा महोत्सव उद्या, 28 ऑगस्टपर्यंत दाखवला जाईल. हे चित्रपट, फिल्म्स डिव्हिजनच्या https://www.youtube.com/FilmsDivision या युट्यूब चॅनेलवर पाहता येतील. या महोत्सवातील चित्रपट पुढील लिंकवरही पाहता येतील. (URL: https://youtube.com/playlist?list=PLZN9KGi5w_4372I7xzUwZZn3A246bGmw1)

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून फिल्म्स डिव्हिजनने ‘राष्ट्राला सलाम’ हा  एक आठवड्याचा कार्यक्रम 23 ते 29 ऑगस्टदरम्यान आयोजित केला आहे. याअंतर्गत, ‘ए व्हॉयेज ऑफ प्रोग्रेस’ आणि ‘रत्नज ऑफ इंडिया’ या ऑनलाईन चित्रपट महोत्सवांचे आणि ‘कालौघात चित्रपट निर्मितीमध्ये तांत्रिक प्रगती’ या वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

‘राष्ट्राला सलाम’च्या दुसऱ्या भागात, सर्वोच्च नागरी सन्मान, भारतरत्न प्रदान करण्यात आलेले विज्ञान, कला आणि संस्कृती क्षेत्रातील काही प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वांचे चरित्रपट दाखवून त्यांचे स्मरण केले जाणार आहे.

‘राष्ट्राला सलाम’च्या पहिल्या भागात, ‘ए व्हॉयेज ऑफ प्रोग्रेस’ चे आयोजन 23 ते 25 ऑगस्टदरम्यान करण्यात आले होते. भारतातील महत्त्वाचे प्रकल्प, उद्योग आणि प्रतिष्ठित संस्थांवरील माहितीपट यात दाखवण्यात आले. महोत्सवात भाक्रा-नांगल, हिराकुड आणि नागार्जुन सागर, ही धरणे, राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा, भाभा अणू संशोधन केंद्र, टाटा मूलभूत संशोधन संस्था (TIFR), भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL), नौवहन आणि तेल उद्योग, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि चांद्रयान व पीएसएलव्हीसारख्या अंतराळ प्रकल्पांच्या यशोगाथा दाखवण्यात आल्या. हे चित्रपट पुढच्या लिंकवर पाहता येतील.

29 ऑगस्टला ‘कालौघात चित्रपट निर्मितीमध्ये तांत्रिक प्रगती’ या वेबिनारने आठवडाभर चालणाऱ्या कार्यक्रमाचा समारोप होईल.

Continue reading

‘अस्मिता मराठीची गौरव कर्तृत्वाचा’ सन्मानसोहळा संपन्न

अस्मिता मराठीची गौरव कर्तृत्वाचा, या शीर्षकाखाली आयोजित करण्यात आलेल्या प्रतिभावंतांचा सन्मान सोहळा हा अत्यंत उच्च दर्जाचा असून सातत्याने हे पुरस्कार गिरगांव कट्टाचे सर्वेसर्वा प्रदीप मालणकर यांनी द्यावेत आणि समाजातल्या बुद्धिवंत, प्रतिभावंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत राहावे, अशा शब्दांत ज्येष्ठ...

जळगावच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर गरुडझेप!

महाराष्ट्रातल्या जळगावची लेक असलेली योगिता शर्मा हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर घवघवीत यश संपादन करून जळगावसह संपूर्ण महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सुरतच्या एसव्ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) येथे नुकत्याच झालेल्या स्टेम 2026 या आंतरराष्ट्रीय परिषदेत रसायनीच्या पिल्लई एचओसी...

सरकारने शेतकऱ्यांची थट्टा थांबवावी!

ऐन दिवाळीच्या तोंडावर दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या हातात भरीव मदत देण्याऐवजी अवघ्या पाच हजार रुपयांची घोषणा करून राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झालेली पिके, कर्जाचा डोंगर आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न या पाच हजार...
Skip to content