Homeटॉप स्टोरीभारतात १०० रुपये...

भारतात १०० रुपये प्रति तास उपलब्ध होणार कृत्रिम बुद्धिमत्ता!

भारत लवकरच मजबूत आणि उच्च दर्जाच्या कॉमन कॉम्प्युटिंग सुविधेसह किफायतशीर किंमतीत आपले स्वतःचे सुरक्षित स्वदेशी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मॉडेल सादर करेल. त्याचप्रमाणे अडीच ते तीन डॉलर्स प्रति तास वापराच्या जागतिक मॉडेलच्या तुलनेत भारताच्या एआय मॉडेलची किंमत ४० % सरकारी अनुदानानंतर प्रति तास १०० रुपयांपेक्षा कमी असेल आणि आकर्षक सहामाही आणि वार्षिक योजनांमुळे ते अधिक परवडणारे बनतील, असा विश्वास केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला आहे.

भारतीय लोकांना अनुकूल असलेली भारतीय भाषांमध्ये अनेक मूलभूत मॉडेल्स, या वर्षअखेरपर्यंत तयार होण्याची शक्यता आहे. कमी खर्च, जलद संगणन आणि त्वरित परिणामांमुळे संशोधक, विद्यार्थी आणि इतर लोकांसाठी ती उपयुक्त ठरतील. सुरुवातीच्या टप्प्यात कृषी, शिक्षण आणि हवामान बदलाशी संबंधित १८ नागरिककेंद्रित ऍप्लिकेशन्स या एआय मॉडेलमध्ये समाविष्ट असतील. त्याचप्रमाणे सुरक्षा प्रोटोकॉलच्या तपासणीनंतरच  डीपसीक भारतीय सर्व्हरवर होस्ट केले जाईल जेणेकरुन वापरकर्ते, कोडर्स, विकासक त्याच्या ओपन सोर्स कोडचा लाभ घेऊ शकतील, असेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, रेल्वे, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत इलेक्ट्रॉनिक्स निकेतन येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली.

भारतीय एआय मॉडेल योग्यवेळी येत आहे. उच्च दर्जाच्या कॉमन कॉम्प्युटिंग सुविधेमुळे भारताचे एआय मिशन आता भारतीय भाषांचा वापर करून भारतीय संदर्भासाठी स्वदेशी एआय सोल्यूशन्स तयार करण्याच्या अगदी जवळ पोहोचले आहे. भारतीय एआय मॉडेल सहा महिन्यांत तयार होण्याची शक्यता आहे. एआय मॉडेलची सुरुवात अंदाजे १० हजार जीपीयू कम्प्युटेशन सुविधेने होत आहे. लवकरच उर्वरित ८६९३ जीपीयूची त्यात भर पडेल. सुरुवातीला संशोधक, विद्यार्थी आणि विकासकांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल. इंडिया एआय मिशन सुरु होण्याच्या १० महिने आधीच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय सुमारे १८६९३ ग्राफिक प्रोसेसिंग युनिट इतकी उच्च दर्जाची तसेच मजबूत कॉमन कॉम्प्युटिंग सुविधा निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे. याची क्षमता ओपन-सोर्स मॉडेल डीपसीकच्या सुमारे नऊ पट तर चॅटजीपीटीच्या सुमारे दोनतृतीयांश आहे, असेही वैष्णव म्हणाले.

केंद्र सरकारने मार्च २४मध्ये १०३७२ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय खर्चासह इंडिया एआय मिशनला मंजुरी दिली होती. सध्याच्या एआय परिसंस्थेतील त्रुटी दूर करण्यावर भर दिला जात आहे. क्लाउडवर एआय सेवांना सूचीबद्ध करण्यासाठी, आणि सीपीपी पोर्टलद्वारे शैक्षणिक संस्था, एमएसएमई, स्टार्टअप्स, संशोधन समुदाय, सरकारे, सार्वजनिक क्षेत्रातील संस्था आणि इंडिया एआयने मान्यता दिलेल्या इतर संस्थांना सेवा प्रदान करण्यासाठी इंडिया एआय स्वतंत्र व्यवसाय विभागाच्या (आयबीडी) माध्यमातून प्रयत्न करत आहे, असे त्यांनी सांगितले.

भारतात २४० विद्यापीठांमधून कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानविषयक अभ्यासक्रम शिकवले जात असून १०० विद्यापीठे ५जी प्रयोगशाळांनी सुसज्ज आहेत. त्यामुळेच स्टॅनफोर्डनेदेखील आपल्या अभ्यासपूर्ण संशोधनात कृत्रिम बुद्धमत्ता तंत्रज्ञानविषयक शिक्षणाच्या बाबतीत भारताला आघाडीच्या देशांमध्ये स्थान दिले आहे, असेही वैष्णव यांनी सांगितले.

Continue reading

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...
Skip to content