Homeचिट चॅटआंबेकर स्मृती शालेय-कॉलेज...

आंबेकर स्मृती शालेय-कॉलेज कॅरम स्पर्धा १० डिसेंबरपासून

कामगार महर्षी गं. द. आंबेकर स्मृती आंतर शालेय-कॉलेज मोफत कॅरम स्पर्धा येत्या १० ते १२ डिसेंबरदरम्यान मुंबईच्या परळ येथील आरएमएमएस वातानुकूलीत सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघातर्फे संस्थापक गं. द. आंबेकर यांच्या स्मृतीदिन-सप्ताहानिमित्त कामगारांच्या मुलामुलींना प्रोत्साहन देण्यासाठी आमदार सचिन अहिर यांच्या पुढाकाराने चॅम्पियन कॅरम बोर्डावर विनाशुल्क कॅरम स्पर्धा भरविण्यात येणार आहे. दोन्ही गटातील प्रत्येकी पहिल्या आठ विजेत्या-उपविजेत्यांना आकर्षक पुरस्कार दिले जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी गोविंदराव मोहिते यांनी दिली.

आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या सहकार्याने होणारी ही स्पर्धा १६ वर्षांखालील शालेय गट तसेच १९ वर्षांखालील काॉलेज गट, अशा दोन गटात रंगणार आहे. नवोदित तसेच उदयोन्मुख ज्युनियर खेळाडूंना यावेळी तज्ज्ञ मंडळीकडून मोफत मार्गदर्शनही केले जाणार आहे. स्पर्धत सहभागी होणाऱ्या मुंबई बाहेरच्या डीएसओ जिल्हा पातळीवर निवड झालेल्या खेळाडूंच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. निवृत्ती देसाई, सुनील बोरकर, बजरंग चव्हाण आदी याकरीता विशेष प्रयत्नशील आहेत. स्पर्धेत प्रवेश घेण्यासाठी संयोजक लीलाधर चव्हाण किंवा क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक यांच्याशी ९००४७५४५०७ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संबंधितांनी केले आहे.

Continue reading

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...

मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता

मुंबईतल्या आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे एमएससी बँक पुरस्कृत मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत शेठ करमशी कानजी इंग्लिश स्कूलचा केवल कुळकर्णी विजेता ठरला. अटीतटीच्या अंतिम आठव्या फेरीत डावाच्या मध्यापर्यंत १०-० अशी आघाडी घेणाऱ्या उमैर पठाणला...
Skip to content