Homeचिट चॅटयेत्या १७ एप्रिलपासून...

येत्या १७ एप्रिलपासून बोरिवलीत रंगणार ‘अजिंक्यतारा’ मल्लखांब स्पर्धा

मल्लखांब लव संघ आणि सुविद्या प्रसारक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १७ ते १९ एप्रिल २०२६दरम्यान सायंकाळी ४ ते रात्री १० या वेळेत स्कूल ऑफ एनवायरन्मेंट ऍण्ड आर्किटेक्चर (एक्सर सुविद्या शाळा), एक्सर रोड, बोरीवली पश्चिम, मुंबई येथे मल्लखांबातील अनभिषिक्त सम्राट दत्ताराम दुदम यांना समर्पित “अजिंक्यतारा चषक” मल्लखांब स्पर्धा सलग ५व्या वर्षी आयोजित करण्यात आली आहे.

त्याचबरोबर सु. प्र. संघाचे अध्यक्ष व कर्ममूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे अमृतमहोत्सवी वर्षदेखील साजरे करण्यात येणार आहे. मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे, पालघर व रायगड या जिल्ह्यातील ५० संस्थांमधून ९००पेक्षा जास्त खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ६/८/१०/१२/१४/१६/१८ वर्षांखालील मुले आणि मुली असे खेळाडूंचे वयोगट आहेत. मल्लखांब खेळातील एकमेव पॅरा मल्लखांब वयोगटातील स्पर्धादेखील‌ यावेळी‌ घेण्यात येणार आहे. सहभागी प्रत्येक खेळाडूस अजिंक्यतारा पदक, सहभाग प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात येईल. तसेच प्रत्येक वयोगटात वैयक्तिक पदकं, सांघिक चषक अशी भरघोस बक्षिसे देण्यात येणार आहेत.

सुविद्या प्रसारक संघाचे सचिव मिलिंद जोशी, स्पर्धा सचिव संचिता देवल, आशिष देवल व दुदम सरांचे विद्यार्थी यांच्या एकत्रित प्रयत्नातून मुंबई उपनगरातील ही भव्य स्पर्धा संपन्न होणार आहे. स्पर्धेच्या आधिक माहितीसाठी स्पर्धाप्रमुख आशिष देवल यांच्याशी ९६६४००२०५१ क्रमांकावर संपर्क साधावा.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content