Homeकल्चर +आवडेल, भावेल असा...

आवडेल, भावेल असा साहित्यिक कार्यक्रम १३ डिसेंबरला मुंबईत

साहित्याची आवड असणाऱ्या सर्व लेखक, वाचक यांना आवडेल, भावेल असा साहित्यिक कार्यक्रम, येत्या १३ डिसेंबरला कोकण मराठी साहित्य परिषद, दादर शाखा आणि कोमसाप, मुंबई जिल्हा, कोमसाप युवा शक्ती यांनी रोटरी क्लब ऑफ मुंबई शिवाजी पार्क, दादर यांच्या सहकार्याने आयोजित केला आहे. हा कार्यक्रम सानेगुरुजी विद्यालय, भिकोबा वामन पाठारे मार्ग, दादर येथे सायंकाळी ४.३० वाजता होईल, अशी माहिती कोमसाप दादर शाखेच्या अध्यक्षा अंजना कर्णिक यांनी दिली आहे.

‘शून्य बघितलेला माणूस’चे लेखक आणि सुप्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ डॉ. तुषार प्रीति देशमुख यांचे मनोगत, लेखन आणि जीवन प्रवास, हे या कार्यक्रमाचे मोठे आकर्षण आहे. यंदा पद्मश्री कविवर्य नारायण सुर्वे जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या काव्याचे सादरीकरण, रसग्रहण आणि शंकर पाटील भाऊ पाध्ये यांच्या कथांचं सादरीकरण युवा शक्तीची तरुण मुले प्रा. दीपा ठाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करतील. कार्यक्रमाचे अध्यक्ष, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर भूषवतील. केंद्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, केंद्रीय कार्यवाह दीपा ठाणेकर, युवाशक्ती प्रमुख स्नेहा वाघ, मुंबई जिल्हाध्यक्ष विद्या प्रभू, शिवाजी पार्क रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. रमेश शेटे आणि इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित असतील, असे कर्णिक यांनी सांगितले.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content