Homeचिट चॅट'अस्मिता मराठीची गौरव...

‘अस्मिता मराठीची गौरव कर्तृत्वाचा’ सन्मानसोहळा संपन्न

अस्मिता मराठीची गौरव कर्तृत्वाचा, या शीर्षकाखाली आयोजित करण्यात आलेल्या प्रतिभावंतांचा सन्मान सोहळा हा अत्यंत उच्च दर्जाचा असून सातत्याने हे पुरस्कार गिरगांव कट्टाचे सर्वेसर्वा प्रदीप मालणकर यांनी द्यावेत आणि समाजातल्या बुद्धिवंत, प्रतिभावंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत राहावे, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते अनिल गवस यांनी गौरवोद्गार काढले.

जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणाऱ्या प्रा. नयना रेगे यांनी आपला पुरस्कार जीवनविद्या मिशनचे प्रणेते सद्गुरु श्री वामनराव पै यांना तर तालतपस्वी श्रीपाद राजगुरु यांनी आपला पुरस्कार गुरु पंडित सुरेश तळवलकर आणि तमाम रसिक श्रोत्यांना अर्पण केला. प्रदीप मालणकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवचरित्राचे गाढे अभ्यासक राजू देसाई, साहित्यिक रवि मल्ल्या, अभिनेते अनिल गवस, क्रिकेट प्रशिक्षक शेखर वराडकर, प्रा. नयना रेगे, शिवसेनेच्या मानवतावादी कार्यावर पीएचडी करणाऱ्या प्रा. डॉ. सरिता वाकोडे, कवी विजय तारी, श्रीपाद राजगुरु, चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर आणि सामाजिक कार्यकर्ते नारायण पारदळे यांचा गौरव ओडिसी नृत्यगुरू शुभदा वराडकर, प्रदीप मालणकर, स्वाती मालणकर, मंजिरी शेटे, जान्हवी गुजराथी, प्रणिता कोळथरकर यांच्या हस्ते करण्यात आला.

या सर्व प्रतिभावंतांचा परिचय ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून रंगमंचावर उभारण्यात आलेल्या पडद्यावर करुन देण्यात आला. मुंबईत फिल्मफेअर अवॉर्ड, झी गौरव, मटा सन्मान असे डोळ्यांचे पारणे फिटेल असे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. अशाच किंबहुना त्याहीपेक्षा सुंदर सोहळा हा प्रतिभावंतांचा सन्मान सोहळा असल्याचे अनिल गवस यांनी यावेळी सांगितले. शुभदा वराडकर यांनी आपल्याला मिळालेला सन्मान हा माझ्या माहेरचा आणि अत्यंत महत्त्वाचा आहे, असे सांगून अशा सोहळ्यांतूनच समाजातील खरे प्रतिभावंत समोर येत असतात असे स्पष्ट केले. प्रारंभी प्रख्यात गायिका रश्मी मुळे यांनी स्वा. वि. दा. सावरकर रचित छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती सादर केली. याच पार्श्वभूमीवर तुतारी आणि गारद यांच्या निनादात राजू देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील अपरिचित साम्राज्याचा इतिहास सादर करुन उपस्थितांना शिवकाळात नेले. प्रदीप मालणकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. दहा प्रतिभावंतांवर मंत्रोच्चारात पुष्पवृष्टी करण्यात आली. प्रख्यात गायिका संगीता मिरकर यांच्या सुमधुर आवाजातील पसायदानाने देवदुर्लभ सोहोळ्याची सांगता झाली. आहुतिचे संपादक गिरीश त्रिवेदी, कार्यकारी संपादक मनीषा त्रिवेदी, निवड समिती सदस्या भक्ती सावंत आदी मान्यवरांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार मिलिंद लिमये यांनी सूत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

जळगावच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर गरुडझेप!

महाराष्ट्रातल्या जळगावची लेक असलेली योगिता शर्मा हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर घवघवीत यश संपादन करून जळगावसह संपूर्ण महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सुरतच्या एसव्ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) येथे नुकत्याच झालेल्या स्टेम 2026 या आंतरराष्ट्रीय परिषदेत रसायनीच्या पिल्लई एचओसी...

सरकारने शेतकऱ्यांची थट्टा थांबवावी!

ऐन दिवाळीच्या तोंडावर दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या हातात भरीव मदत देण्याऐवजी अवघ्या पाच हजार रुपयांची घोषणा करून राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झालेली पिके, कर्जाचा डोंगर आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न या पाच हजार...

रजेवर भिमनवार; एमपीएससीच्या हंगामी अध्यक्षपदी वाघोले स्वार!

राज्याच्या विधि न्याय विभाग आणि संसदीय कार्य विभागाचे निवृत्त सचिव सतीश वाघोले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) हंगामी (प्रभारी) अध्यक्षपदी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी नियुक्ती केली आहे. एम.पी.एस.सी.च्या प्रश्नपत्रिका फुटत असल्याच्या प्रकरणावरून एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्यासाठी...
Skip to content