Homeचिट चॅटराष्ट्रीय स्लिंगशॉट स्पर्धेत...

राष्ट्रीय स्लिंगशॉट स्पर्धेत गौरव मोकाशींना सुवर्णपदक

१४वी राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिप-२०२६ स्पर्धा छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ४० ते ४५ वर्षे वयाच्या गटात दहिसर, मुंबईचे गौरव मोकाशी यांनी सुवर्णपदक पटकावले. या आधीच्या राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिपमध्ये त्यांना रौप्यपदक मिळाले होते. यावेळेची त्यांची कामगिरी खूपच सरस झाली. गौरव यांनी आपले सुवर्णपदक काका, दिवंगत ज्येष्ठ पत्रकार अभय मोकाशी यांना समर्पित केले आहे.

स्लिंगशॉट, म्हणजे आपली भारतीय बेचकी, हिला आता आंतरराष्ट्रीय खेळाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. २०१८ साली इटलीमध्ये पहिली वर्ल्डकप स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या खेळात खेळाडूंना विशिष्ट अंतरावर ठेवलेल्या लक्ष्यावर म्हणजे टार्गेटवर अचूक नेम लागण्यासाठी सराव करावा लागतो. यामुळे एकाग्रता आणि अचूकता वाढीस लागते. सध्या चीन, इटली, स्पेन, झेक प्रजासत्ताक, जर्मनी, अमेरिका, ब्राझील, व्हिएटनाम आणि भारतासह ३६हून अधिक देशांमध्ये हा खेळ खेळला जातो. ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्याच्या दृष्टीनेसुद्धा, वर्ल्ड स्लिंगशॉट असोसिएशन आणि वर्ल्ड स्लिंगशॉट फेडरेशन यासारख्या संघटना प्रयत्न करीत आहेत. स्पेन आणि त्यानंतर थायलंडमध्ये पुढील वर्ल्डकप स्पर्धा होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

येत्या रविवारी आस्वाद घ्या ‘त्रिधा’चा

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने आंतरराष्ट्रीय संगीत दिनाच्या निमित्ताने एक विशेष संगीत कार्यक्रम ‘त्रिधा’ सादर होणार आहे. येत्या रविवारी, १८ ऑक्टोबरला सायंकाळी साडेपाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाची संकल्पना प्रसिद्ध तबलावादक पं. विजय घाटे यांची...

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...
Skip to content