Homeकल्चर +लहान मुलगा व...

लहान मुलगा व गाईच्या नात्याची झलक पाहा ‘धाराऊ’मध्ये!

बुलढाणा अर्बन मीडिया हाऊस प्रस्तुत, मनिष सुरेश शिंदे दिग्दर्शित ‘धाराऊ’चा अधिकृत पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला असून या पोस्टरने या चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. ग्रामीण महाराष्ट्राची पार्श्वभूमी, मातीशी जोडलेली नाती आणि गोमातेबद्दलची श्रद्धा यांची भावस्पर्शी मांडणी करणाऱ्या ‘धाराऊ’ या मराठी चित्रपटाच्या पोस्टरमध्ये “धाराऊ” या नावासोबतच पोस्टरवरील निरागस मुलगा आणि त्याच्यासोबत दिसणारी गाय यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते लक्ष वेधून घेत आहे. निसर्गरम्य ग्रामीण वातावरण, गावची पार्श्वभूमी आणि या दोघांच्या नात्यातील आपलेपणा यामुळे पोस्टरमधून चित्रपटाच्या भावविश्वाची सुंदर झलक पाहयला मिळते.

बुलढाणा अर्बन मीडिया हाऊस प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती राधेश्याम चांडक (भाईजी), डॉ. सुकेश झंवर आणि कोमल झंवर यांनी केली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन मनिष शिंदे यांनी केले आहे. या पोस्टरमध्ये एका छोट्या मुलाचा गायीशी असलेला भावनिक बंध केंद्रस्थानी दिसतो. त्यामुळे गोमाता, श्रद्धा, माया आणि माणूसपण या भावनांना चित्रपटात नेमक्या कोणत्या पद्धतीने मांडले आहे, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. पोस्टरच्या रंगसंगतीपासून ते ग्रामीण लोकेशनपर्यंत प्रत्येक गोष्ट चित्रपटाच्या मातीतल्या कथेला अधोरेखित करते.

चित्रपटाच्या तांत्रिक टीममध्ये छायाचित्रण दिग्दर्शक के. विजय, संकलन मंगेश शेटके, ध्वनीमिश्रण निखिल लांजेकर, हिमांशू आंबेकर, वेशभूषा श्रावणी जाधव, मेकअप व हेअरस्टाईल स्नेहल कारंडे, संगीत प्रज्वल यादव व अभिषेक काटे, पार्श्वसंगीत प्रज्वल यादव, गीतकार प्रशांत मधुपवार यांचा समावेश आहे. तसेच गायक अवधूत गांधी, सन्मिता धापटे शिंदे, देवांश भाटे आणि वृषभ साठे यांनी चित्रपटासाठी आपले योगदान दिले आहे. हा चित्रपट येत्या २३ ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...

मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता

मुंबईतल्या आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे एमएससी बँक पुरस्कृत मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत शेठ करमशी कानजी इंग्लिश स्कूलचा केवल कुळकर्णी विजेता ठरला. अटीतटीच्या अंतिम आठव्या फेरीत डावाच्या मध्यापर्यंत १०-० अशी आघाडी घेणाऱ्या उमैर पठाणला...
Skip to content