Homeटॉप स्टोरीअमेरिका आणि इराण...

अमेरिका आणि इराण समझोता तात्पुरता! पुन्हा संघर्ष चिघळणार?

गेल्या साडेतीन महिन्यांपासून सुरू असलेल्या अमेरिका आणि इराणच्या संघर्षात अखेर समेट झाल्याचे अमेरिकेने जाहीर केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या काल झालेल्या वाढदिवशी अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करार अंतिम झाल्याचे जाहीर केले. समाजमाध्यमावर पोस्ट करत ट्रम्प यांनी स्वतः ही माहिती दिली. इराणनेही ट्रम्प यांच्या दाव्याला पुष्टी दिली आहे. मात्र, या संघर्षात सहभागी असलेल्या इस्त्रायलने लेबनानवरचे आपले हल्ले चालूच ठेवले आसून त्यांनी आपल्या कृतीतून ही शांतता करार तात्पुरता असून पुढे तीव्र संघर्ष होईल, असे सूतोवाच केले आहे. १४ मुद्द्यांवर आधारित असलेल्या या शांतता करारावर येत्या १९ जूनला स्वित्झर्लंडमध्ये जिनिव्हात दोन्ही देशांकडून सह्या होतील. अमेरिकेतर्फ स्वतः ट्रम्प किंवा उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स तर इराणकडून इराणी संसदेचे अध्यक्ष कालीबाफ तसेच परराष्ट्रमंत्री अरागची यावेळी हजर असतील, असे समजते.

या करारावरील चर्चेपासून अमेरिका तसेच इराणने इस्त्रायलला दूर ठेवले आहे. लेबनानमध्ये इस्त्रायलकडून हिज्बुल्लाहचे निष्कासन करण्यासाठी सुरू असलेले हल्ले चालूच आहेत. अशावेळी इराण-अमेरिकेने या करारात इराण तसेच इराणसमर्थित हिज्बुल्लाह, हूती, हमास अशा सर्व कथित प्रॉक्सी गटांवरील हल्ले थांबवण्यास मान्यता देण्यात आली आहे. हा करार प्रत्यक्षात उतरला तर इस्त्रायलला लेबनानवरचे हल्ले ताबडतोब थांबवावे लागतील. इस्त्रायलने या करारावर प्रतिक्रिया देताना हे हल्ले चालूच राहतील, असे स्पष्ट केले आहे. इराणमध्ये सुरू असलेल्या आण्विक कार्यक्रमावर पुढच्या ६० दिवसांत चर्चा केली जाणार आहे. इराणला आण्विक कार्यक्रमाची मुभा दिली जाऊ नये तसेच इराणने समृद्ध केलेले युरेनियम ताब्यात घेण्यासाठी सुरू केलेले युद्ध पूर्णत्वास न्यावे याकरीता इस्त्रायल आग्रही आहे. त्यामुळेच इस्त्रायलला या करारापासून दूर ठेवण्यात येत आहे. आणि त्यामुळेच इस्त्रायलकडून या शांतता कराराला मान्यता देण्यात आलेली नाही.

इराण

या प्रस्तावित करारानुसार, अमेरिका इराणच्या छोट्या स्वरूपातल्या आण्विक कार्यक्रमाला मान्यता देईल. यानुसार इराणला ३.६७ टक्के युरेनियम समृद्ध करता येईल. इराणला मिसाईल तसेच स्वरक्षणार्थ युद्धसाहित्याने सज्ज होण्यास अनुमती राहील. अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराण तसेच त्यांच्या समर्थित गटांवरील हल्ले कायमचे रोखले जातील. इराणच्या भोवतालचे सैन्य अमेरिका काढून घेईल. होर्मूझ सामुद्रधुनीवरील नाकेबंदी अमेरिका येत्या ३० दिवसांत पूर्णपणे दूर करेल. इराणही होर्मूझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली करेल. यावरील नियंत्रण इराणकडेच राहील. अमेरिका इराणची २४ अब्ज डॉलरची गोठवलेली रक्कम मोकळी करेल. इराणवरील हल्ल्यात झालेल्या नुकसानानंतर इराणच्या पुनर्निर्माणाकरीता या गोठवलेल्या रकमेतले ३०० दशलक्ष डॉलर तातडीने अदा करेल. या तसेच इतर काही मुद्द्यांवर येत्या १९ जूनला स्वाक्षऱ्या होईपर्यंत दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या काही फेऱ्या होण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी या शंतता कराराची घोषणा केल्यानंतर आणि इराणने त्याला दुजोरा दिल्यानंतर आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाची किमत घसरली. तेल ८० ते ८३ रुपये प्रतिबॅरल दरापर्यंत खाली आले. भारतात शेअर बाजाराने उसळी घेतली. शेअर बाजार ११०० अंकांनी तर निफ्टी ३०० अंकांनी वधारला. सोन्याचा दरही २३०० रुपये प्रति तोळाप्रमाणे वाढला. हा करार करण्यात पाकिस्तान आणि कतारने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे बोलले जाते.

1 COMMENT

Comments are closed.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content