Homeकल्चर +उद्धव ठाकरे करणार...

उद्धव ठाकरे करणार रजनीश काकडेंच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन

मुंबई प्रेस क्लबने त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकाजवळच्या वास्तूत दिवंगत ज्येष्ठ छायाचित्र-पत्रकार रजनीश काकडे यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन येत्या ८ मेपासून आयोजित केले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर साधारण महिनाभर हे प्रदर्शन सर्वसामान्य जनतेसाठी खुले राहील, असे प्रेस क्लबच्या सूत्रांनी सांगितले.

साधारण दोन-अडीच महिन्यांपूर्वी रजनीश काकडे यांचे निधन झाले. वय अवघे ५५ वर्षे. हे वय होत का जाण्याचं? नाही. पण नियतीला काय माहित की त्याच्या हातून अजून कुणाकुणाचे फोटो कुठल्या परिस्थितीत काढायचे आहेत ते! फोटोलाच गुंगारा देऊन (तसा तो सर्वांनाच गुंगारा देत मस्त फोटो शोधत असायचा नेहमीच!) तो दिवस सुरु व्हायच्या आधीच अंतर्धान पावला होता. रजनीश यकृताच्या विकाराने बेजार होता. रुग्णालयात दाखल केले होते. घरीच औषधे व उपचार करा, असे सांगून डिस्चार्ज मिळाला होता. तब्येत सुधारत होती. स्थिर होती. अचानक हार्टअटॅक आला आणि होत्याचे नव्हते झाले. धडपडीचा तसेच चपळाईचा क्षण थप्प झाला. रजनीश कायमचा निघून गेला..

वर्तमानपत्र वा वृत्त विभागाला कोणत्या प्रकारचा फोटो लागतो याची जाण रजनीशला उपजतच होती. या जाणीवेपोटीच तो जिवन्त फोटोसाठी काही तास बैठक मारून बसत वा उभा राहत असे. उभा राहिला तर सतत जागा बदलत असे. मनाजोगा ‘अँगल’ मिळत नसे तोवर तो सैरभैर होत असे. २६/११ मुंबई बॉम्बस्फोटाच्या वेळी त्याची नजर ताजमहाल हॉटेलवरून कित्येक तास हलली नव्हती हे त्याच्या यशस्वीतेचे गमक आहे. हे सर्व फोटो आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजले होते हे सांगायला नकोच.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content